Kolhapur News : जि.प. आरोग्य विभागातील 23 कर्मचाऱ्यांना पदोन्नती

समुपदेशन पद्धतीने पारदर्शक प्रक्रिया
kolhapur Zilla Parishad
kolhapur Zilla Parishad
Published on
Updated on

कोल्हापूर : जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची पदोन्नती प्रक्रिया मंगळवारी समुपदेशन पद्धतीने पारदर्शक वातावरणात पार पडली. या प्रक्रियेत एकूण 23 कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली असून कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत व उपाध्यक्ष तानाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया राबविण्यात आली. आरोग्य व बांधकाम समितीच्या सभापती सारिका नांदेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यामध्ये पाच महिला कर्मचाऱ्यांना आरोग्य पर्यवेक्षक पदावर, 11 महिला कर्मचाऱ्यांना आरोग्य सहायक पदावर आणि सात पुरुष कर्मचाऱ्यांना आरोग्य सहायक पदावर पदोन्नती देण्यात आली.

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांच्या सूचनेनुसार संपूर्ण प्रक्रिया समुपदेशन व पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या पसंतीनुसार पदस्थापनेची संधी उपलब्ध झाली. पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांनी तसेच कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी प्रक्रियेबाबत समाधान व्यक्त करत जिल्हा परिषद प्रशासनाचे आभार मानले. यावेळी आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच विविध कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पदोन्नती मिळालेले कर्मचारी

आरोग्य पर्यवेक्षक (महिला) : 05

आरोग्य सहायक

(महिला) : 11

आरोग्य सहायक

(पुरुष) : 07

एकूण पदोन्नती : 23 कर्मचारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news