

कोल्हापूर : काळम्मावाडी योजनेच्या ३३ केव्ही उच्चदाब वाहिनीवर आयसोलेटर बसविण्याचे काम सोमवारी व मंगळवारी केले जाणार आहे. त्यामुळे या दोन दिवसांत काळम्मावाडी योजनेचा वीजपुरवठा बंद राहणार असून शहराचा नियमित पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे.
बुधवारीही काही भागांत अपुरा व कमी दाबाने पाणी मिळण्याची शक्यता आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेने शिंगणापूर, बालिंगा व नागदेववाडी येथील पंपिंग स्टेशनमधून पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन केले आहे. मात्र, पर्यायी व्यवस्थेतून पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा शक्य नसल्याने नागरिकांनी आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा आणि पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे. या कामाचा ए, बी व ई वॉर्डमधील बहुतांश भागांतील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.