Kolhapur News : अतिक्रमण अन्‌‍ वाहतूक कोंडी; ट्रॅफिक पोलिसांची नेहमीच दांडी

अंबाबाई मंदिर परिसरातील चित्र; वन वे नियम धाब्यावर
Kolhapur News
कोल्हापूर : वाहतूक नियंत्रण पोलिस नसल्याने महाद्वार रोड व जोतिबा रोडवरील वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे.
Published on
Updated on

कोल्हापूर : अंबाबाई मंदिर परिसरातील महाद्वार रोड, ताराबाई रोड, गुजरी आणि बाबुजमाल कमान परिसर अतिक्रमण, बेशिस्त पार्किंग आणि वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडला आहे. भाविक आणि पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेता या भागात वाहतूक नियंत्रणाची गरज असतानाही प्रत्यक्षात ट्रॅफिक पोलिसांचा मागमूसही दिसत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

महाद्वार रोडवर सकाळपासून रात्री उशिरापर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. बाबुजमाल कमानीसमोर पर्यटक आणि ग््रााहक वाहने अस्ताव्यस्त उभी असल्याने स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी फेरीवाल्यांच्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे.

दुमजली पार्किंग सुविधाकडे पाठ

सरस्वती टॉकीज परिसरात पार्किंगची सुविधा असतानाही वाहनचालक ती वापरत नसल्याने वाहतूक व्यवस्थेचा पूर्ण बोजवारा उडाला आहे. पर्यटक वाहन धारकांपर्यंत या पार्किंग सुविधाची माहिती पोहोचवणे गरजेचे आहे.

कसबा गेटकडून महाद्वार रोडमध्ये दुचाकी वाहनांची सर्रास घुसखोरी सुरू असून नो एन्ट्रीच्या नियमांचे खुलेआम उल्लंघन होत आहे. भाविकांची मोठी गर्दी असतानाही अनेक वाहनचालक चुकीच्या दिशेने वाहने घालत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news