Kolhapur News | सिरसे येथे स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट: सुदैवाने जीवितहानी टळली!

सिरसे येथे गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे घराच्या झालेल्या पडझडीचे छायाचित्र
सिरसे येथे गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे घराच्या झालेल्या पडझडीचे छायाचित्र
Published on: 
Updated on: 

कौलव : सिरसे ता राधानगरी येथील काशिनाथ एकनाथ सांगळे यांच्या घरातील स्वयंपाकाच्या नवीन भरून आणलेल्या गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले .घराची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले आहे .सुदैवाने जीवित हानी झाली नाही.

सांगळे यांचे कुटुंब गरीब असून मोलमजुरी करून ते उतरनिर्वाह करतात. त्यांनी शासकीय योजनेतून घरकुल बांधले होते. आज संध्याकाळी नऊच्या सुमारास घरातील गॅस सिलेंडरच्या पाईपने अचानक पेट घेतल्याने त्यांनी पाईप सोडण्याचा प्रयत्न केला मात्र आगीचा भडका उडाला. त्यामुळे भीतीने सर्व कुटुंबीय घरातून बाहेर पळून गेले. मात्र सिलेंडरने पेट घेतल्याने कानठळ्या बसवणारा मोठा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज सुमारे दोन किलोमीटर पर्यंत गेला.

या भीषण दुर्घटनेत घराची मोठ्या प्रमाणात पडझड झाले असून छत उध्वस्त झाले आहे. त्याचबरोबर भांडी व प्रापंचिक साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे . शेजारच्या दोन घरांची ही मोठी पडझड झाली आहे. केवळ दैव बलवत्तर म्हणून जीवित हानी झाली नाही . स्फोटामुळे काही काळ गावातील विद्युत पुरवठाही खंडित झाला होता. या स्फोटामुळे भीतीचे वातावरण पसरले आह .

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news