Kolhapur News | पडसाळीच्या धनगरवाड्याचा रस्ता अज्ञातांकडून चर खोदून बंद!

धनगरवाड्याचे दळणवळणच बंद!
पडसाळी पैकी खोपेचा धनगरवाडा:येथील मुख्य  रस्त्यावर चर खोदल्याने रस्ता वाहतूकी साठी बंद झाला आहे.
पडसाळी पैकी खोपेचा धनगरवाडा:येथील मुख्य रस्त्यावर चर खोदल्याने रस्ता वाहतूकी साठी बंद झाला आहे.
Published on
Updated on

गुडाळ :- राधानगरी तालुक्यातील पडसाळी पैकी खोपेचा धनगरवाड्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर अज्ञात व्यक्तींनी जेसीबीच्या साहाय्याने दोन ठिकाणी आडव्या चरी मारून रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला आहे.

एकमेव रस्ता बंद झाल्याने धनगरवाड्यातील ग्रामस्थांचा दळणवळणाचा प्रश्न गंभीर बनला असून, आजारी व्यक्तींना दवाखान्यात नेणे कठीण झाले आहे. दरम्यान,संतप्त ग्रामस्थांनी शुक्रवारी राधानगरी तहसील कार्यालयात निवेदन देऊन रस्ता तातडीने खुला करण्याची मागणी केली. मात्र अद्याप ही काहीही कार्यवाही न झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

पडसाळी फाटा ते हिंडाल्को माईन्स या रस्त्यावरून खोपेचा धनगरवाड्याकडे जाणारा खडीकरणाचा पक्का रस्ता आहे. हिंडाल्कोने खाणकाम सुरू करताना येथे धनगर बांधवांसाठी पर्यायी घरे आणि रस्ता बांधून दिला आहे.

शेती व पशुपालन हा ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय असून वस्तीला जोडणारा मुख्य रस्ताच बंद झाल्याने बाह्य जगाशी संपर्क तुटल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने तातडीने रस्ता खुला करावा अशी मागणी पडसाळी चे माजी सरपंच बळवंत शेळके, बाबू शेळके, नागो शेळके, तानाजी यमकर, यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news