Kolhapur News : जिल्ह्यामध्ये पाच लाख झाडे लावणार; आजपासून प्रारंभ

जिल्हाधिकारी डॉ. राठोड; हरित प्राधिकरणाच्या पहिल्याच बैठकीत निर्णय
kolhapur |
जिल्ह्यामध्ये पाच लाख झाडे लावणार; आजपासून प्रारंभ
Published on
Updated on

कोल्हापूर : जिल्ह्यात यावर्षी पाच लाख झाडे लावली जाणार आहेत. त्याचा प्रारंभ बुधवारपासून केला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी हरित प्राधिकरणाची पहिलीच बैठक झाली. या बैठकीत जिल्ह्यात २०४७ पर्यंत १ कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्टही निश्चित करण्यात आले.

राज्यात यावर्षी ११ कोटी झाडे लावण्यात येणार आहेत. त्यापैकी जिल्ह्यात ५ लाख झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, खासगी -सार्वजनिक सहभाग (पीपीपी), ग्रामपंचायतींचे नियोजन आणि विविध विभागांचा समन्वय यावर भर देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हरित महाराष्ट्र आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. या आयोगाची वृक्षारोपण मोहिमेची आढावा बैठक मंगळवारी दुपारी झाली. तत्पूर्वी जिल्हा पातळीवरील स्थापन केलेल्या हरित प्राधिकरणाची जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news