Madhuri Elephant : माधुरी हत्तीण लवकरच नांदणीत परतणार

‘वनतारा’ची टीम दाखल; सोईसुविधांचे काम युद्धपातळीवर सुरू
Madhuri Elephant
माधुरी हत्तीण लवकरच नांदणीत परतणार
Published on
Updated on

जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील मठाची महादेवी ऊर्फ माधुरी हत्तीण लवकरच परत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या ‘वनतारा’ (जामनगर) येथे असलेल्या माधुरीच्या स्वागतासाठी नांदणीत हालचालींना वेग आला आहे. रविवारी रात्री ‘वनतारा’ची टीम नांदणीत दाखल झाली असून, सोमवारपासून माधुरीच्या तात्पुरत्या निवासाची व सोयी-सुविधांची कामे युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहेत.

याअंतर्गत हत्तीच्या शेडची रंगरंगोटी, गारव्यासाठी शॉवर व कुलर, फिरण्यासाठी वाळूचा ट्रॅक आणि सुरक्षेसाठी जाळ्या बसवण्याचे काम दोन दिवसांत पूर्ण केले जाणार आहे. या कामांचा अहवाल आणि व्हिडीओ उच्चस्तरीय समितीकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल. समितीच्या हिरव्या कंदिलानंतर माधुरी हत्तीण लवकरच नांदणीत दाखल होईल.

नांदणी मठाच्या ६ एकर जागेत प्रशस्त असा ‘माधुरी वाडा’ साकारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पुनर्वसन केंद्र उभारणीबाबत बांधकामाला पूर्वपरवानगी देण्यात आली होती. यात प्रवेशद्वार, शेड, पाण्याचा टँक, हायड्रो थेरपी सेंटर, खाद्य किचन शेड, औषध केंद्र, गॅलरी, पार्किंग, टॉवर गॅलरी, ट्रॅक, अन्य हत्तींच्या उपचारासाठी केंद्र, अपघातकालीन व्यवस्था, पशुवैद्यकीय टीम, माहुत व कर्मचारी गृह व्यवस्था उभारण्यात येणार होते. मात्र, मंजुरीअंती या जागेत डीपी रोड असल्याची तांत्रिक बाब समोर आली आहे. त्यामुळे याचा निर्णय आता मंत्रालयात पोहोचला आहे. सध्या ‘वनतारा’ येथे माधुरी हत्तीणची प्रकृती चांगली आहे. मंत्रालयातील प्रक्रियेनंतर ‘माधुरी वाड्याचे’ काम काही महिन्यांत पूर्ण होईल. मात्र, त्यापूर्वीच नांदणी येथे आणण्यासाठी सर्वांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news