

कोल्हापूर : खंडणीसाठी राजारामपुरी येथील हॉटेल व्यावसायिकाचे अपहरण करून बेदम मारहाण करत एक लाख 30 हजाराची खंडणी उकळणाऱ्या गुंडासह त्याच्या मैत्रिणीला राजारामपुरी पोलिसांनी मंगळवारी बेड्या ठोकल्या. अमोल अशोक जाधव (43, रा. चित्रनगरीजवळ मोरेवाडी) व स्वप्नाली कौंदाडे (34, शिरोली, ता. हातकणंगले) अशी संशयितांची नावे आहेत.
संशयितांना न्यायालयाने 5 दिवस कोठडी बजावली आहे. अमोल जाधववर खुनाच्या 5 गुन्ह्यांचे रेकॉर्ड आहे. हॉटेल व्यावसायिक अर्जुन अजित तळेकर यांनी फिर्याद दाखल केली आहे.