Gokul Milk Election : 5 हजार 470 संस्थांना 1 जूनपर्यंत ठरावाच्या प्रती

गोकुळ मतदार यादी कार्यक्रमात अवसायनातील 1,050 संस्थांचाही समावेश
Gokul Milk  |
Gokul Milk Election
Published on
Updated on

आशिष ल. पाटील

गुडाळ : ‘गोकुळ‌’च्या निवडणूक प्रक्रियेचा महत्त्वाचा टप्पा असलेला मतदार यादीचा कार्यक्रम दि. 26 मे पासून सुरू झाला असून, कट ऑफ डेटमधील गोकुळच्या सर्व 5,470 संस्थांना 1 जूनपर्यंत टप्प्याटप्प्याने ठरावाच्या प्रती पाठविण्याचा निर्णय प्राधिकृत अधिकारी तथा सहायक निबंधक (दुग्ध) कृष्णा ठाकरे यांनी घेतला आहे.

दरम्यान, अवसायनाची प्रक्रिया सुरू असलेल्या 1,320 संस्था पैकी 1,050 संस्थांचा मतदार यादीच्या कट ऑफ डेटमध्ये समावेश आहे. या संस्थांनाही ठराव प्रक्रियेत सहभागी करून घेतले जाईल. मात्र, दरम्यानच्या काळात होणाऱ्या सुनावणीच्या निकालात यापैकी ज्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होईल त्या संस्था कच्च्या प्रारूप यादीतूनच सहकार निवडणूक अधिकारी तथा विभागीय उपनिबंधक (दुग्ध) पुणे यांच्याकडून वगळल्या जातील.

31 जानेवारी 2026 अखेर गोकुळला 5,981 एवढ्या संस्था सभासद आहेत. मात्र, 4 मे 2023 च्या कट ऑफ डेटमध्ये त्यापैकी 5,470 संस्थांचाच समावेश राहील. अवसायनातील संस्थांच्या बाबतीत निर्णय झाल्याशिवाय निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येऊ नये, असे उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे निर्देश होते. त्यामुळे या वादग््रास्त संस्थांना ठराव प्रक्रियेत सहभागी करून घेतल्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही, असे सांगण्यात येते. त्याशिवाय मतदार यादी कार्यक्रम म्हणजे निवडणूक प्रक्रिया नाही. यापूर्वी मतदार यादी कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर चार-सहा महिन्यांनी प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक झाल्यानंतर त्यांच्याकडून निवडणुकीची अधिसूचना काढून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणे, हा मुख्य निवडणूक कार्यक्रम समजला जातो. त्यामुळेच उच्च न्यायालयाच्या निर्देशाचे उल्लंघन होणार नाही, असे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news