Kolhapur News : अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीत गौरवाड येथे आठ एकर ऊस जळून खाक; लाखोंचे नुकसान

गौरवाड येथे अग्नितांडव; शेतकऱ्यांसमोर प्रश्न, पेटलेल्या उसाचे करायचे काय?
Kolhapur News : अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीत गौरवाड येथे आठ एकर ऊस जळून खाक; लाखोंचे नुकसान
Kolhapur News : अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीत गौरवाड येथे आठ एकर ऊस जळून खाक; लाखोंचे नुकसान
Published on: 
Updated on: 

कवठेगुलंद : गौरवाड (ता. शिरोळ) येथे अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीत तब्बल आठ एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली. या आगीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे अंदाजे आठ लाख रुपयांचे नुकसान झाले असून, ऐन गळीत हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे.

या आगीत मतीन शेख, बाबासो पटेल, सिकंदर चौगुले, बिस्मिल्ला पटेल, रशीद पटेल, इरफान मोमीन व अफसर पटेल यांच्या ऊस क्षेत्राचे मोठे नुकसान झाले. आग लागल्याचे समजताच दत्त साखर कारखाना आणि कुरुंदवाड नगरपालिकेच्या अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले; मात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणात ऊस जळून खाक झाला होता.

दरम्यान, गळीत हंगाम सुरू होण्यास अद्याप सुमारे एक महिन्याचा कालावधी असल्याने जळालेला ऊस कारखान्याला कधी आणि कसा पाठवायचा, तसेच त्याचे पुढे काय करायचे, असा गंभीर प्रश्न संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. जळालेला ऊस तातडीने तोडून गाळपासाठी स्वीकारावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

अज्ञात व्यक्तीने ऊस पेटविल्याचा संशय असून, या घटनेची चौकशी करून आग लावणाऱ्याचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. ऐन उत्पादनाच्या काळात ऊस जळाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, प्रशासन व संबंधित साखर कारखान्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news