Kolhapur Crime : विमानतळ चरस प्रकरणाचे धागेदोरे दिल्लीपर्यंत

स्थानिकासह दिल्लीतील तरुणास अटक
Kolhapur Crime News
विमानतळ चरस प्रकरणाचे धागेदोरे दिल्लीपर्यंत
Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळावरील कर्मचाऱ्याकडे सापडलेल्या ७१ ग्रॅम चरसप्रकरणी गांधीनगर पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली. कर्मचारी ओमकार मिठारी याला फोन करून चरस बाहेर आणण्यास सांगणारा मयूर गणेश माने (४०, रा. सम्राटनगर) आणि माने याला कॉल करून चरसची जागा सांगणारा बिपिन कुमार सूर्यभान सैरावत (३४, रा. द्वारका, दिल्ली) अशी अटक केलेल्यांची नावे असून दिल्लीतील जिम ट्रेनर आकाशचा शोध सुरू आहे.

चरस तस्करीमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषणने विमानतळावरील कर्मचारी ओमकार मिठारी याला शनिवारी जेरबंद केले होते. त्याच्या चौकशीनंतर मानेला अटक केली. मानेच्या चौकशीनंतर बिपिन कुमारला अटक केली. चरस टाकून जाणाऱ्या आकाशचा शोध सुरू असल्याचे गांधीनगर पोलिसांनी सांगितले. अटकेतील दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. दोघांना सहायक पोलिस उपनिरीक्षक विजय कोळी अधिक तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news