Kolhapur News : हजारो हेक्टर सुपीक जमीन धोक्यात; शक्तीपीठ महामार्गाविरोधात सरवडेतील शेतकरी रस्त्यावर

Kolhapur News : हजारो हेक्टर सुपीक जमीन धोक्यात; शक्तीपीठ महामार्गाविरोधात सरवडेतील शेतकरी रस्त्यावर
Published on
Updated on

सरवडे : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गामुळे सुपीक शेतजमीन गमावण्याच्या भीतीने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी सरवडे येथे तीव्र 'रास्ता रोको' आंदोलन करत शासनाविरोधात एल्गार पुकारला. राधानगरी तालुका बहुजन विकास संघटना आणि बाधित शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेकडो शेतकरी, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जोपर्यंत हा प्रकल्प रद्द होत नाही, तोपर्यंत मंत्र्यांना या भागात फिरू देणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news