Kolhapur News : ‘त्या’ २३ अतिक्रमणांवर बुलडोझर

तावडे हॉटेल परिसरातील माजी नगरसेवक डकरे यांच्या मिळकतींचा समावेश
Kolhapur News
‘त्या’ २३ अतिक्रमणांवर बुलडोझरfile photo
Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर ते गांधीनगर रोडवरील तावडे हॉटेल परिसर... सोमवारी सकाळी ७.४० ची वेळ... आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड तावडे हॉटेल चौकातून गांधीनगरला जाणाऱ्या रस्त्यावरील डाव्या बाजूच्या मिळकतींकडे आले... दोन मिनिटे पाहणी केली अन्‌ सकाळी ७.४२ ला ट्रान्स्पोर्ट कंपन्यांच्या अतिक्रमणावर महापालिकेने हातोडा टाकला... माजी नगरसेवक राजेंद्र डकरे यांच्यासह इतरांच्या १४ मिळकतींतील २३ बेकायदेशीर बांधकामांवर बुलडोझर फिरवला. यापूर्वी २६ मे २०१४ रोजी कारवाई झाली होती. स्थगितीमुळे तब्बल १२ वर्षांचा न्यायालयीन लढा जिंकल्यानंतर येथील अतिक्रमणे उद्ध्व‌स्त करण्यात आली.

या कारवाईसाठी महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी सकाळी ६.३० पासूनच तावडे हॉटेल चौकात जमले होते. तीन पथके तयार करण्यात आली. प्रत्येक पथकात अधिकारी-कर्मचारी नेमून त्यांना जेसीबीसह इतर यंत्रणा पुरविण्यात आली. पंचनामा आणि व्हिडीओ शूटिंग करत एकाचवेळी तीन ठिकाणी कारवाई सुरू करण्यात आली. ब्ल्यू लाईन, आरक्षित जागेवरील अतिक्रमणांचा त्यात समावेश होता. आयुक्त डॉ. भारूड, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांच्याकडे संबंधित मिळकतधारक, व्यापारी साहित्य काढून घेण्यासाठी दोन-चार तास वेळ मागत होते. परंतु अधिकाऱ्यांनी त्यांना आता युक्तिवाद करू नका, महिनाभर वेळ दिला होता. आता थेट कारवाईच होईल, असे सुनावले.

यांची बांधकामे पाडली (कंसात क्षेत्र)

१) राहुल राजेंद्र टिक्के (१३५.०४ चौ.मी.)

२) नीलेश टिक्के (९८.१६ चौ.मी.)

३) राहुल बबन जाधव व सागर बबन जाधव (१८३ चौ.मी.)

४) चंद्रकांत बाबूराव खाडे, श्रीकांत बाबूराव खाडे (३७.३३ चौ.मी.)

५) शामला प्रकाश चौगले (३००.३ चौ.मी.)

६) मोहिनी दिलीप पाटील (२०४.५ चौ.मी.)

७) राजेंद्र डकरे (१११.३ चौ.मी.)

८) चंद्रकांत बाबूराव खाडे व श्रीकांत बाबूराव खाडे,

रमेश सरनाईक (२७७.८ चौ.मी.)

९) राजेंद्र डकरे (२४२.७ चौ.मी.)

१०) राजेंद्र डकरे (२६१.२ चौ.मी.)

११) राणी गोविंदराव रामचंदाणी (६७.५० चौ.मी.)

१२) विश्वास निरमलदार वाधवाणी (६१.५४ चौ.मी.)

१३) राहुल राजेंद्र टिक्के (२५३.६ चौ.मी.)

१४) अमरसिंह उदयसिंह सरनोबत (४१७.४ चौ.मी.)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news