Kolhapur News | चक्कर आल्याने शियेची वृद्ध महिला उड्डाण पूलावरून खाली कोसळली, जागीच ठार

शिरोली एमआयडीसी पोलीसांत घटनेची नोंद
Kolhapur News
Kolhapur News | चक्कर आल्याने शियेची वृद्ध महिला उड्डाण पूलावरून खाली कोसळली, जागीच ठार Kolhapur News
Published on
Updated on

नागाव:- पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर एमआयडीसी पहिला फाटा आंबेडकर नगर येथील उड्डाणपुलावरून खाली पडल्याने वृद्ध महिला जागीच ठार झाली. ही घटना गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली . ठार झालेली वृद्ध महिला शिये ता. करवीर येथील असून तिचे नाव शांताबाई सखाराम पवार ( वय ७३ ) असे आहे. ही महिला भिक्षेकरी होती.

ही महिला भिक्षा मागून आपले जीवन जगत असे. रोजच्या प्रमाणे शिये येथील आपल्या घरातुन शिये फाट्यावर येऊन नागाव येथील आंबेडकर नगर येथे आली होती. या ठिकाणी तिला चक्कर आल्याने ती उड्डाणपूलावरून ती खाली पडली. शिरोली एमआयडीसी पोलीसांनी तिला तात्काळ उपचारासाठी कोल्हापूर येथील सिपीआर रुग्णालयात दाखल केले असता तिचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले . तिच्या मागे मुले सुना नातवंडे असा परिवार आहे...

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news