

तुरंबे : कोल्हापूर-गारगोटी मार्गावरील चंद्रे पाटी येथे झालेल्या अपघातात एका वृद्धाचा मृत्यू झाला. कृष्णात पांडुरंग पाटील (वय 62, रा. चंद्रे) असे त्यांचे नाव आहे. या अपघातात दुचाकीवरील दोघे युवकही जखमी झाले आहेत.
कृष्णात पाटील हे पायी जात असताना भरधाव दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, त्यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांसह नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना तातडीने खासगी वाहनातून कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या मागे पत्नी, विवाहित मुलगी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.