Eknath Shinde : पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा यांच्यामुळे सहकार समृद्ध

उपमुख्यमंत्री शिंदे : शेतकरी, सर्वसामान्यांच्या जीवनात समृद्धी आणण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध
Eknath Shinde
Eknath Shinde
Published on
Updated on

इचलकरंजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी प्रस्थापितांची मक्तेदारी मोडून सहकाराचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या नेतृत्वामुळे देशातील सहकाराला समृद्धीची दिशा मिळाली, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. राज्य शासनाच्या तिजोरीवर पहिला अधिकार शेतकर्‍यांचा आहे. सहकाराच्या माध्यमातून शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या जीवनात समृद्धी आणण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध असून शेतकर्‍यांना कर्जमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत इचलकरंजीत आयोजित महायुतीच्या सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, पश्चिम महाराष्ट्राची साखरपट्टा म्हणून ओळख आहे. एकूण उत्पादनात महाराष्ट्राचे योगदान मोठे आहे. लाखो शेतकर्‍यांचे ते बॅकबोन आहे. महाराष्ट्राचा विकास व्हायचा असेल, तर सहकार चळवळ मजबूत झाली पाहिजे. त्यामुळे या भागातील शेतकरी, सहकारी संस्थांच्या काही अपेक्षा आहेत. त्या पूर्ण होणेही गरजेचे आहे. इचलकरंजीचे भाग्य बदलण्यासाठी आणि शेतकर्‍यांच्या, कष्टकर्‍यांच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती कटिबद्ध आहे. महायुती सरकार यापुढेही वस्त्रोद्योग, सहकाराला निश्चितच पाठबळ देईल. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर, जयकुमार गोरे, संजय सावकारे, शिवेंद्रराजे भोसले, आशिष शेलार, आ. राहुल आवाडे, माजी आ. प्रकाश आवाडे आदी उपस्थित होते.

माणसांच्या मनांना विणणारी आवाडे जनता बँक

माणसांच्या मनांना विणणारी आणि माणसांच्या मनाला ओळखून कार्यरत असणार्‍या कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेला सर्वोत्कृष्ट बँकेचा बहुमान मिळाला आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरातमध्ये या बँकांच्या शाखा आहेत. उद्‌घाटन झालेली बँकेची प्रशासकीय इमारत आधुनिक आणि लोकाभिमुख सहकार व्यवस्थेचे केंद्र बनेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

कल्लाप्पाण्णा आवाडे यांची सक्सेस स्टोरी

कल्लाप्पाण्णा आवाडे हे नाव सक्सेस स्टोरीच आहे. वयाच्या ९५ व्या वर्षीही त्यांचा उत्साह उदंड आहे. त्यामुळे आजचा कार्यक्रम फक्त सहकारी बँक आणि सहकारी साखर कारखान्याचा नाही, तर सहकारातून समृद्धीचाच आहे. शेतकर्‍यांची आणि हजारो सदस्यांची शक्ती पाहायची असेल, तर ती इचलकरंजीला पाहायला मिळाली, असे गौरवोद्‌गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news