Kolhapur News | दत्तवाड येथील दूधगंगा नदीचे पात्र पडले पुन्हा कोरडे...! शेतकऱ्यांची पिके वाचवण्यासाठी धडपड

पाण्याअभावी पिकांना वाचवायचे कसे, शेतकरी वर्ग हतबल
Kolhapur News
दत्तवाड येथे कोरडे पडलेले नदीचे पात्र
Published on
Updated on

दत्तवाड: दतवाड तालुका शिरोळ येथील दूध गंगा नदीचे पात्र दहा ते बारा दिवसानंतर पुन्हा कोरडे पडले आहे. पाण्याअभावी पिकांना वाचवायचे कसे असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडले आहे तर सर्वसामान्य ग्राहकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. पाण्याची गरज भागवण्यासाठी बोरवेल्स, कुपनलिका, विहिरी आदिंचा आधार नागरिकांना घ्यावा लागत आहे.

गेल्या दोन दिवसापासून या भागात ढगाळ वातावरण होत आहे मात्र पावसाचा पत्ता नाही नदीपात्रात पुन्हा पाणी येईपर्यंत एखादा चांगला वळीव पाऊस पडावा अशी आर्त भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. सध्या उन्हाचा तडाका वाढल्याने शेतीसाठी पाण्याची गरज फारच वाढली आहे. त्यातच अनेक शेतकऱ्यांनी उसाच्या लावणी व ख महागडी खतांची मात्रा देऊन उसाच्या भरण्या केल्या आहेत. भरणी केल्यानंतर किमान दोन पाणी तरी आठ ते दहा दिवसाच्या अंतराने मिळणे आवश्यक आहे मात्र नदीपत्रात पाणीच नसल्याने पिकांना पाणी द्यायचे कुठून असा सवाल नागरिकांना पडला आहे.

घोसरवाड दत्तवाड टाकळीवाडी नवे व जुने दानवाड आदी गावांची शेतीची अवस्था पाण्याअभावी बिकट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे तरी संबंधित विभागाने दूधगंगा नदी पात्रात त्वरित पाणी सोडावे अशी मागणी होत आहे. तसेच नदीपात्रात सोडलेले पाणी दत्तवाड हे दूधगंगा नदीवरील शेवटचे गाव असल्याने येथे पाणी अडवण्यासाठी भक्कम व्यवस्था प्रशासनाने करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news