पत्नीच्या चारित्र्यावर संशय, पतीला राग अनावर झाला अन्...

पतीच्या हल्ल्यातील जखमी पत्नीचा मृत्यू; वाठार येथील घटना
Wife killed by husband at Vathar
वठार येथे पतीच्या हल्ल्यातील जखमी पत्नीचा मृत्यू file photo

किणी : चारित्र्याच्या संशयावरून झालेल्या वादात पतीने पत्नीच्या डोक्यात मसाला वाटण्याचा दगड घातल्याने जखमी झालेल्या पत्नीचा बुधवारी उपचारावेळी मृत्यू झाला. वाठार (ता. हातकणंगले) येथे २२ जूनला ही घटना घडली होती. आयेशा सलमान पटेल (वय २६) असे मृत विवाहितेचे नाव आहे. वडगाव पोलिसांनी आयेशाचा पती सलमान उमर पटेल याला ताब्यात घेतले आहे.

आयुब गुलाब मुल्ला (रा. तासगाव, जि. सांगली) यांची मुलगी आयेशाचा विवाह डिसेंबर २०१९ मध्ये वाठार येथील मेहुणी जहारा उमर पटेल यांचा मुलगा सलमान याच्याशी झाला होता. सलमान शिरोली एमआयडीसी येथील एका कंपनीत नोकरीस आहे. लग्न झाल्यापासून सलमान आयेशावर चारित्र्याचा संशय घेऊन मारहाण करीत होता. जावई सलमान याने आयेशा हिचा डोक्यात दगड घालून खून केल्याची फिर्याद आयेशाचे वडील गुलाब मुल्ला यांनी वडगाव पोलिसांत दिली. अधिक तपास पोलिस निरीक्षक विलास भोसले, उपनिरीक्षक गिरीश शिंदे करत आहेत.

Wife killed by husband at Vathar
kolhapur Accident: पुलाची शिरोली येथे ४ वाहने एकमेकांवर आदळली

राग अनावर झाला अन्..!

रविवारी (दि. २२) दुपारी सलमान कामावरून घरी आल्यानंतर पती- पत्नीत किरकोळ वाद झाला. रात्री दहा वाजता तो घरी आल्यानंतर पुन्हा भांडण झाले. सलमानची आई जहारा यांनी हे भांडण सोडवले व जेवण करून झोपी गेल्या, तरीही पती-पत्नीत वाद सुरूच होता. मध्यरात्री साडेबारा वाजता रागाच्या भरात सलमानने मसाला वाटण्याचा दगड आयेशाच्या डोक्यात घातला व घरातून निघून गेला. जहारा यांनी आरडाओरडा केल्यानंतर शेजारी व नातेवाईकांनी बेशुद्धावस्थेत आयेशाला कोल्हापूर येथील प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना तिचा बुधवारी मृत्यू झाला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news