Fraud Case: डॉक्टरसह वृद्धास 65 लाखांचा गंडा

जादा परताव्याचे आमिष : आपटेनगर येथील एकास अटक
Fraud Case: डॉक्टरसह वृद्धास 65 लाखांचा गंडा
File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा 15 टक्के परताव्याच्या आमिषाने लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या सराईत भामट्यांनी कोल्हापूरसह परिसरात धुमाकूळ घातला आहे. प्रतिभानगर येथील पेन्शनधारक विजयानंद रत्नाकर पाटील (वय 59) व डॉ. रमेश पुंडलिक बागडी (45, मणेरमळा, उचगाव, ता. करवीर) यांची अनुक्रमे 34 लाख 45 हजार व 30 लाख 55 हजार रुपये अशी एकूण 65 लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीला आला. या भामट्याविरुद्ध राजारामपुरी व गांधीनगर पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले आहेत.

डॉ. रमेश बागडी यांची 30 लाख 55 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गांधीनगर पोलिसांनी संशयित सुनील पांडुरंग माने (वय 52, रा. आपटेनगर, नवीन वाशी नाका, कोल्हापूर) यास मंगळवारी पहाटे अटक केली. विजयानंद पाटील यांची ऑनलाईनद्वारे 33 लाख 45 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी श्रीकृष्णरथसह याच्या अनोळखी साथीदाराविरुद्ध राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

विजयानंद पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, अनोळखी संशयितांनी मोबाईल व व्हॉटस्‌‍ ॲपद्वारे संपर्क साधून कोलकाता येथील ‌‘अबाऊट वेल्थ मॅनेजमेंट कम्युनिटी‌’ या कंपनीचे सेबीने स्टॉक बोकर म्हणून नोंदणीकृत प्रमाणपत्र पाठवून श्रीकृष्णरथ नामक व्यक्तीने व्हिडीओ कॉल करून तसेच व्हेरिफिकेशन करून घेऊन व्हॉटस्‌‍ ॲपवर लिंक पाठविली.

संशयिताने ‌‘अबाऊट वेल्थ मॅनेजमेंट कम्युनिटी‌’ या व्हॉटस्‌‍ ॲप ग्रुपमध्ये सहभागी करून त्यावर शेअर्स ट्रेडिंग ग्रुपमध्ये सहभागी करून घेत असल्याचा बनाव केला. विश्वासाचा गैरफायदा घेत संशयित टोळीने बँक खात्यावर रकमा भरणा करण्यास प्रवृत्त करून 33 लाख 45 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचे म्हटले आहे. दि. 1 मे 2025 ते जून 2025 या काळात हा प्रकार घडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news