Kolhapur Stray Dog Attack : चंदगडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांचा बालिकेसह पाचजणांवर हल्ला

Stray dog attack
File Photo
Published on
Updated on

चंदगड : चंदगड शहरात शनिवारी रात्री व रविवारी सकाळी पिसाळलेल्या दोन भटक्या कुत्र्यांनी एक वर्षाच्या बालिकेसह पाचजणांवर हल्ला करून जखमी केले. यापैकी जखमी बालिकेवर बेळगाव येथे उपचार सुरू आहेत. नगरपंचायतने या भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.

येथील कॉलेज रोडवर शनिवारी रात्री 9.15 वाजता पिसाळलेल्या कुत्र्याने आझाद गल्लीतील फारुख बेपारी (18), झिशान मुल्ला (13) या दोन बालकांसह तरुण रोहित धुपदाळे (30) यांच्यावर हल्ला करून तिघांच्याही उजव्या हातालाच चावे घेतलेे.

त्यांच्यावर चंदगड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. रविवारी (दि. 10) सकाळी आणखी एका पिसाळलेल्या कुत्र्याने घराच्या कट्ट्यावर बसलेल्या साजिया सलमान बेपारी या एक वर्षाच्या बालिकेच्या कानाजवळ चावा घेऊन गंभीर जखमी केले. तिच्यावर बेळगाव येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान, शहरासह परिसरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून बंदोबस्ताची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news