

मुरगूड : मुरगूड - निढोरी मार्गावरील स्मशानभूमीमध्ये आज सकाळी भानामतीचा प्रकार आढळून आला. यापूर्वीही अन्य एका स्मशानभूमीत भानामतीचा प्रकार झाला होता अशा भानामतीच्या प्रकाराबद्दल नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
येथील स्मशान भूमीत मातीच्या मडक्यावरती लाल कपडे बांधून त्याच्यावर हळदीकुंकू आणि पूजा केली असल्याचे तसेच त्याच्या बाजूला लिंबू व इतर साहित्य असल्याचे मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांनी पाहिले त्यानी हे सर्व साहित्य इतरत्र नेऊन टाकले. मात्र या ठिकाणी असा प्रकार दिसून आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही स्मशानभूमी अनेक महिने नादुरुस्त अवस्थेत आहे. याठिकाणी कोणत्याही मृतदेहाचे अंत्यसंस्कार केले जात नाहीत पण भानामतीचे प्रकार वारंवार होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. असे प्रकार करणाऱ्यावर वेळीच कारवाईची गरज आहे. नागरिकांतून या प्रकाराबद्दल तीव्र संताप पसरला आहे.