Kolhapur News : बाळूमामांची बकरी आदमापुरमध्ये दाखल

दीपावली पाडव्या दिवशी होणार बकरी बुजवणे कार्यक्रम
Balumama's goat arrives Admapur
Kolhapur News : बाळूमामांची बकरी आदमापुरमध्ये दाखलpudhari photo
Published on
Updated on

मुदाळतिट्टा : महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश मध्य प्रदेश गोवा आधी राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र आदमापुर ता. भुदरगड येथील सद्गुरु बाळूमामा यांची बकरी मंगळवार (दि. 29) रोजी आदमापूर येथे दाखल झाली आहेत.

दीपावली पाडवा या दिवशी बकरी बुजवणे व लेंडी पूजन अशा संयुक्त कार्यक्रमासाठी ही बकरी आदमापूर येथे आली आहेत.सध्या महाराष्ट्र व कर्नाटकात 19 ठिकाणी कळपांच्या(बग्गा) माध्यमातून 32 हजारावर बकरी चाऱ्यासाठी फिरत आहेत. या बाळूमामाच्या बकऱ्याची त्यांचे भक्तगण मनोभावे सेवा करीत आहेत. दिवसेंदिवस बाळूमामाची बकरी वाढतच आहेत. दीपावली पाडवा या दिवशी बाळूमामा नी लेंडी व बकरी बुजवणे जो कार्यक्रम सुरू केला होता, तो कार्यक्रम पार पाडण्यासाठी यामधील एक कळप दरवर्षी आदमापूर येथे येतो.

भंडाराच्या उधळणीत बकऱ्यांचे स्वागत

कारभारी नागाप्पा मिरजे यांचा कळप क्रमांक सहा यावर्षी आदमापुर मध्ये दाखल झाला आहे. गावच्या वेशीपासुन ढोल कैताळाच्या आवाजात ,भंडाराच्या उधळणीत, डॉल्बीच्या ठेक्यावर या बकऱ्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर बाळूमामाच्या समाधी स्थळी मालकाच्या दर्शनासाठी बकऱ्यांची मंदिराभोवती प्रदर्शना काढण्यात आली.

गावातून मरगुबाई मंदिराकडे बकरी जात असताना सुहासिनींनी त्यांचे औक्षण केले. ठिकठिकाणी फटाक्याची आतषबाजी करून बकरी आदमापूर येथे आल्याचा जल्लोष साजरा केला. साधारणपणे एक महिना ही बकरी आदमापूर येथे राहणार आहेत. त्यामुळे बकरी तळावर रोज अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news