Kolhapur News : विधिवत पूजेनंतर मेतकेतील बाळूमामांचा मूळ दिव्यखांब भाविकांसाठी खुला

Kolhapur Metke Sant Balumama Divya Khamb
Published on
Updated on

हमीदवाडा : थोर कर्मयोगी संत सद्गुरू बाळूमामांचे मूळ क्षेत्र म्हणून ख्याती असलेल्या मेतके (ता. कागल) येथील मंदिरात, स्वतः बाळूमामांनीच १९३२ मध्ये रोवलेला मूळ दिव्यखांब तीन तासांच्या मंत्रोच्चार व विधिवत पूजेनंतर संस्थानने दर्शनासाठी खुला केला. संपूर्ण श्रावण महिना भाविकांना या मूळ १४ फुटी खांबाचे दर्शन घेता येणार आहे.

बाळूमामांच्या आयुष्यातील जवळपास ४० वर्षांचा काळ मेतके व परिसर क्षेत्रात गेला आहे. १९३२ मध्ये स्वतः मामांनीच येथे आपले दैवत 'श्री हालसिद्धनाथ' मंदिराची स्थापना केली. हेच मंदिर सध्या 'श्री हालसिद्धनाथ - बाळूमामा मंदिर' म्हणून प्रसिद्ध आहे. याच मंदिरात हा दिव्यखांब स्वतः बाळूमामांनी भक्तांच्या इडा-पिडा दूर करण्यासाठी रोवला आहे. "एक खांब कैलासात व दुसरा मेतक्यात" असे मामा या खांबाबद्दल म्हणायचे.

अशा या दिव्यखांबावर संस्थानने १३ वर्षांपूर्वी पंचधातूंचे वेष्टन चढवले आहे. ११ महिने हा सागवानी खांब या वेष्टनात असतो, मात्र प्रत्येक श्रावण महिन्यात हे वेष्टन काढून मूळ खांब भाविकांना दर्शनासाठी खुला केला जातो.

त्यानुसार ट्रस्टचे कार्याध्यक्ष पापा पाटील-कौलवकर, अध्यक्ष आर. डी. पाटील व विश्वस्त दयानंद पाटील, बळीराम मगर, देवाप्पा पुजारी यांच्या हस्ते विधिवत पूजन व अभिषेकानंतर हा मूळ खांब दर्शनासाठी खुला करण्यात आला. यावेळी प. पू. भगवानगिरी महाराज, ट्रस्टच्या सदस्या पद्मजा तिवले, बाबासाहेब पाटील व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news