Kolhapur Accident : शिक्षकी पेशातून कमावला मोठा मान; अपघाताने घेतला मुख्याध्यापकाचा प्राण

मॉर्निंग वॉकला गेले असता अज्ञात वाहनाची धडक
Kolhapur Accident News
Kolhapur Accident News
Published on
Updated on

कोडोली : कोडोली -बोरपाडळे रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या चर्च कौन्सिल प्राथमिक शाळेचे माजी मुख्याध्यापक अविनाश शामराव समुद्रे (वय ७४, रा. गणेश पार्क कोडोली, ता. पन्हाळा) यांचा अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी पहाटे साडे पाच वाजण्याच्या दरम्यान कोडोली हायस्कूल समोर घडली.

अविनाश समुद्रे पहाटे मॉर्निंग वॉकसाठी घरातून बाहेर पडले. ते कोडोली-पोखले फाटा इथून घरी परत जात असताना कोडोली हायस्कूलसमोर मागून आलेल्या भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. धडक इतकी जोरात होती की, ते सुमारे २५ फूट रस्त्यावरून फरफटत गेले. त्यानंतर वाहनाचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच कोडोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनाम केला. समुद्रे यांच्या मागे पत्नी, दोन मुली, मुलगा, सुना व नातवंडे असा परिवार आहे. दरम्यान, पोलिसांनी या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज पाहिले; परंतु अद्याप त्या वाहनाचा ठावठिकाणा लागलेला नाही. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news