

मुरगूड : येथील ग्रामदैवत अंबाबाई यात्रेनिमित्त मुरगुड मधील शर्यत प्रेमी यांच्या वतीने आयोजित तब्बल १ लाखाच्या बैलगाडी शर्यतीत 'ब 'गटातून कुर्डूवाडी ( ता . करवीर ) येथील शिवा कुर्डूची बैलजोडी 'मुरगूड केसरी' ठरली. त्यांना एक लाखाचे इनाम मिळाले .आदत दुस्सा गटामध्ये कंदलगावच्या नितीन संकपाळच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावला .
या स्पर्धेमध्ये राज्यभरातील नामांकित बैलगाडी सहभागी झाल्या होत्या. बगत स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक कोगनोळी येथील बबलू बस्तवडेच्या बैलजोडीला मिळाला . त्यांनी ७१ हजारचे बक्षिस पटकावले . तर तृतीय क्रमांकाचे ५१ हजारचे बक्षिस इंगळीच्या विकास खोत व इंगळे आण्णा यांच्या बैलगाडीला मिळाले .
आदत दुस्सा गटातील दुसरा क्रंमाक करगणी येथील भिमराव व्हनमाने यांच्या बैलजोडीला मिळाला . तृतीय क्रमाक म्हाकवे येथील संग्राम चौगले यांच्या बैलगाडीने पटकावला तर चौथा क्रंमाक चिंचणीच्या दर्शन कुमरोळे यांना मिळाला.
मुरगूडच्या सरपिराजीराव तलाव माळ परिसरात झालेल्या या शर्यती पाहाण्यासाठी शौकीनांची प्रचंड गर्दी झाली होती . बक्षिस वितरण माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, माजी उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले, बजरंग सोनुले, माजी नगरसेवक जगन्नाथ पुजारी , विक्रम गोधडे, दत्तात्रय मंडलिक , पांडुरंग मगदूम ,पांडुरंग पूजारी, पृथ्वीराज कदम आदींच्या हस्ते व सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव करे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
स्पर्धेच्या नियोजनासाठी अंबाबाई उत्सव स्पर्धा समितीचे पदाधिकारी पांडुरंग पुजारी यांनी काम पाहिले. तर शिवाजी मोरबाळे यांनी आभार मानले. यावेळी सुखदेव पाटील, अरुण मेंडके , पृथ्वीराज कदम , रोहित मोरबाळे, अजित कांबळे, पृथ्वीराज चव्हाण,अजित शिंदे ,अमित गोधडे , प्रितेश साळोखे, समाधान बोते,वैभव पाटील, अवधूत मोरबाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.