kolhapur | शिक्षणाचा कोल्हापूर मनपा पॅटर्न राज्यात अव्वल

शिष्यवृत्ती 5 हजार रुपये करणारी महाराष्ट्रातील एकमेव महापालिका
kolhapur | शिक्षणाचा कोल्हापूर मनपा पॅटर्न राज्यात अव्वल
Published on
Updated on

कोल्हापूर : महापालिका प्राथमिक शिक्षण समितीमार्फत राबवल्या जाणार्‍या राजर्षी छत्रपती शाहू शिष्यवृत्ती योजनेच्या रकमेत वाढ करण्याचा क्रांतिकारी निर्णय झाला आहे. त्यानुसार आता ही शिष्यवृत्ती 2400 ऐवजी राज्य सरकारच्या शिष्यवृत्ती इतकीच 5 हजार रुपये केली आहे. शासकीय शिष्यवृत्तीएवढी स्वतंत्र शिष्यवृत्ती देणारी कोल्हापूर महापालिका ही महाराष्ट्रातील एकमेव ठरली आहे.

इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांची शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेची पूर्वतयारी व्हावी यासाठी महापालिकेतर्फे दोन सराव चाचण्या व एक अंतिम सराव परीक्षा घेतली जाते. गुणवत्ता यादीतील पहिल्या 25 विद्यार्थ्यांना दोन वर्षांसाठी ही शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. विशेष म्हणजे राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवणार्‍या विद्यार्थ्यांना तीन वर्षांपासून इस्रो या जागतिक दर्जाच्या संस्थेचा अभ्यास दौरा चक्क विमानाने घडवून आणला जात आहे. या प्रवासाचा सर्व खर्च महापालिका उचलते.

केवळ पाचवीच नव्हे तर पहिली व दुसरीसाठी कोल्हापूर टॅलेंट सर्च, तिसरी व सहावीसाठी प्रज्ञाशोध परीक्षा आणि चौथी व सातवीसाठी स्कॉलरशिप परीक्षा आयोजित करून महापालिकेने शिक्षणाचा आदर्श पॅटर्न उभा केला आहे. मनपा शाळेत शिकणारे पहिली ते सातवीतील सर्वच विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षेला सामोरे जातात. स्पर्धा परीक्षा घेणारी महानगरपालिका ही महाराष्ट्रातील एकमेव महापालिका आहे. आयुक्त के. मंजुलक्ष्मी, उपायुक्त किरणकुमार धनवाडे, प्रशासन अधिकारी डी. सी. कुंभार, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी रसूल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे शैक्षणिक प्रकल्प यशस्वीपणे राबवले जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news