Keshavrao Bhosale Natyagruha | ‘केशवराव’सह खासबागचे ब्रिटिशकालीन गर्डल भंगारात

Keshavrao Bhosale Natyagruha |
Keshavrao Bhosale Natyagruha | ‘केशवराव’सह खासबागचे ब्रिटिशकालीन गर्डल भंगारात
Published on
Updated on

कोल्हापूर : केशवराव नाट्यगृहासह खासबागचे ब्रिटिश बनावटीचे २५ पोलादी गर्डल महापालिका प्रशासनाने भंगारात विकल्याचा गंभीर आरोप कृती समितीने केला. नाट्यगृहाला आग लागल्यानंतर स्क्रॅप विक्रीमध्ये अवघ्या सात लाख रुपयांना हा व्यवहार करताना पुरातत्त्व विभागालाही अंधारात ठेवले. या मुद्द्यावरून सोमवारी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणी कामाच्या आढावा बैठकीत मनपा प्रशासन आणि नाट्यप्रेमींमध्ये चांगलीच खडाजंगी झाली.

शाहू महाराज यांनी शंभर वर्षांपूर्वी खास लंडनमधून मागवून घेतलेल्या गर्डलवर महत्त्वाच्या नोंदी होत्या. हेरिटेज समितीची परवानगी न घेता गर्डल विकले कसे, असा सवाल इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, वसंत मुळीक यांनी केला.

मनपाचे स्पष्टीकरण अमान्य

आगीत निकामी झालेले गर्डल रासायनिक तपासणीनंतर पुनर्वापरासाठी अयोग्य असल्याचा अहवाल आल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले. मात्र ते विकण्याचा अधिकार मनपा प्रशासनाला नसून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी समितीचे अध्यक्ष अशोक पोवार यांनी केली.

टक्केवारीचा मुद्दा ऐरणीवर

नाट्यगृहाचे काम करणाऱ्या एका कंपनीकडून टक्केवारीचा व्यवहार झाल्याचा व्हिडीओ दोन दिवसांपासून व्हायरल होत आहे. त्यामध्ये तथ्य आढळून नाट्यगृह बांधकामाचा दर्जा घसरला तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा रंगकर्मी सुनील घोरपडे यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news