Kolhapur News : नोटिसांचा खेळ अन्‌‍ तडजोडीचा मेळ?

तावडे हॉटेल परिसरातील बांधकामांबाबत चित्र
Kolhapur Municipal Corporation
Kolhapur Municipal Corporation
Published on
Updated on

सुनील सकटे

कोल्हापूर : तावडे हॉटेल परिसरातील मनपा जागेतील बांधकामांबाबत न्यायालयीन आदेशानुसार नोटीस दिल्या आहेत. मात्र, कायद्याचा आधार घेत नोटिसांचा खेळ करून तडजोडीचा मेळ तर नाही ना, अशी चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, 204 बांधकामांपैकी व्यावसायिक मिळकतींना बुधवारपासून नोटिसा बजावण्यात येत आहेत.

तावडे हॉटेल ते गांधीनगरमधील 158 एकरपर्यंत मनपाची जागा आहे. 1945 पासून याची नोंद आहे. या जागेत एकूण 133 गट आहे. सर्वोच्च न्यायालयाने ग््राामपंचायतीचा दावा फेटाळला असून, ‌‘जैसे थे‌’चे आदेशही रद्द केले. या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी गांधीनगरमधील महापालिका हद्दीतील मिळकतींचा सर्व्हे करण्याचे आदेश दिले होते. यात 204 मिळकती असल्याचे समोर आले. न्यायालयाने नैसर्गिक न्यायानुसार संबंधितांना नोटीस पाठवून योग्य ती प्रक्रिया करून कारवाईचे आदेश दिले आहेत.

या आदेशाचा आधार घेत झारीतील शुक्राचार्यांनी नोटिसांचा खेळातून तडजोडीचा मेळ साधण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे समजते. ब्ल्यूलाईनमधील 37, न्यायालयाचा अवमान करून झालेली 88 आणि आरक्षित जागेतील अतिक्रमीत बांधकामे 18 या मिळकतींवर कारवाई अनिर्वाय आहे. मात्र, उर्वरित मिळकतींना ‌‘अभय‌’ देण्यासाठी यंत्रणा सक्रिय झाल्याचे समजते. उर्वरित व्यावसायिक मिळकतींना परवान्याच्या मुद्द्यावरून सील करण्याची कारवाई होऊ शकते.

अशा आहेत मिळकती

तावडे हॉटेल परिसरात एकूण 204 मिळकती आहेत. यात व्यावसायिक 133, निवासी 66, आरक्षित जागेवरील अनधिकृत बांधकामे 18, ब्ल्यू लाईनमधील बांधकामे 37 आणि न्यायालयाचा अवमान करून केलेली 88 बांधकामे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news