

गारगोटी : दहावीच्या वर्गात शिकणारा विद्यार्थी प्रथमेश (वय 15) यास फूस लावून मुदाळ येथून पळवून नेल्याची फिर्याद वडील पांडुरंग मारुती फासके (रा. उंदरवाडी, ता. कागल) यांनी पोलिसांत दिली आहे. याप्रकरणी भुदरगड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
प्रथमेश हा बुधवारी सकाळी 8 वा. सुमारास मुदाळ येथील परशराम बाळाजी पाटील माध्यमिक विद्यालयात शाळेसाठी निघून आला होता. तो दहावीच्या वर्गात शिकत होता. तो सकाळी 10.30 वा. शाळेच्या मैदानावर भेटला होता. त्यानंतर तो कोठे गेला हे समजले नाही. वाट पाहूनही तो सायंकाळी घरी परतला नाही. अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेले असल्याची फिर्याद वडील पांडुरंग मारुती फासके यांनी पोलिसांत दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, परशराम बाळाजी पाटील माध्यमिक विद्यालयातील पर्यवेक्षक टी. एम. रेडेकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रथमेश फासके हा विद्यार्थी प्रशालेत आला नाही. तसेच या विद्यार्थ्यांचा प्रवेश आपल्या प्रशालेत नसल्याचे सांगितले.