Kolhapur Accident : एसटीच्या चाकाखाली सापडून कर्मचारी ठार

मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील घटना; चालकावर गुन्हा दाखल
Kolhapur Accident News
एसटीच्या चाकाखाली सापडून कर्मचारी ठार
Published on
Updated on

कोल्हापूर : मध्यवर्ती बसस्थानकातील एसटी वर्कशॉपमधील रॅम्पमध्ये काम करत असताना एसटीच्या चाकाखाली सापडून कर्मचाऱ्याचा जागीचा मृत्यू झाला. पांडुरंग अण्णाप्पा चव्हाण (वय ५४, रा. भादोले, ता. हातकणंगले) असे मृताचे नाव आहे. शनिवारी (दि. १५) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी चालक सिकंदर मणेर याच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पांडुरंग चव्हाण हे एसटीमध्ये चालक म्हणून कर्तव्यास होते. मात्र, आजारपणामुळे त्यांची नेमणूक एसटीच्या वर्कशॉपमध्ये केली होती. शनिवारी सकाळी ते वर्कशॉपमधील रॅम्पमध्ये काम करून वरती परत येत होते. सकाळी ११ वाजता चालक सिकंदर मणेर हे एसटी वर्कशॉपमध्ये दुरुस्तीसाठी घेऊन जात होते. रॅम्पवरून त्यांनी एसटी पुढे नेली असता, पुढच्या चाकाखाली पांडुरंग चव्हाण आले. त्यांच्या अंगावरूनच एसटीचे चाक गेल्यामुळे ते जागीच मयत झाले. वर्कशॉपमधील इतर कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा केल्यामुळे मणेर यांनी एसटी थांबवली. मात्र, तत्पूर्वी चव्हाण मृत झाले होते. शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news