Kolhapur municipal corporation: महापौरपद निश्चित, उपमहापौरपदावर संभ्रम

6 फेबुवारीला मतदान : महायुतीचा सत्तावाटप ‌‘फॉर्म्युला‌’ अद्याप गुलदस्त्यात
Kolhapur Municipal Corporation
Kolhapur Municipal Corporation Pudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदासाठी शुक्रवार, दि. 6 फेबुवारीला निवडणूक होणार असून, सोमवार, दि. 2 फेबुवारीला दुपारी 3 ते 5 या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. महापालिकेच्या ताराराणी सभागृहात अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया पार पडणार आहे.

या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार आहे. सध्याच्या सदस्यसंख्येनुसार महापालिकेत महायुतीकडे 45, तर महाविकास आघाडीकडे 35 नगरसेवकांचे संख्याबळ आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेच्या दृष्टीने महायुतीचे पारडे जड मानले जात असले, तरी महायुतीतील सत्तावाटपाचा ‌‘फॉर्म्युला‌’ अद्याप अंतिम झालेला नाही.

महापौरपदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) आरक्षण जाहीर झाले आहे. महापौरपदासाठी भाजपकडून रूपाराणी निकम, विजयसिंह खाडे-पाटील, प्रमोद देसाई, वैभव कुंभार, विजय देसाई, सुरेखा ओटवकर यांची नावे चर्चेत असून, इच्छुकांची संख्या अर्धा डझनाच्या पुढे गेली आहे. 81 सदस्यसंख्या असलेल्या महापालिकेत महापौर निवडीसाठी किमान 41 नगरसेवकांची आवश्यकता आहे. काँग््रेासकडे सर्वाधिक 34 नगरसेवक असले, तरी त्यांना बहुमतासाठी 6 नगरसेवकांची कमतरता भासते. याउलट भाजप (26), शिवसेना (15) आणि राष्ट्रवादी काँग््रेास (4) मिळून महायुतीकडे 45 नगरसेवकांचे बहुमत असल्याने महापौरपदावर महायुतीचा दावा भक्कम मानला जात आहे.

उपमहापौरपदावर मौन

महायुती सत्ता थापन करणार हे जवळपास निश्चित मानले जात असले, तरी उपमहापौरपदासाठी अद्याप एकही नाव अधिकृतपणे चर्चेत आलेले नाही. महापौरपद भाजपकडे गेल्यास उपमहापौरपद शिवसेनेच्या वाट्याला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. महायुतीचा सत्तावाटपाचा ‌‘फॉर्म्युला‌’ दोन दिवसांत निश्चित होण्याची शक्यता असून, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापूर दौऱ्यानंतर होणाऱ्या बैठकीत हा ‌‘फॉर्म्युला‌’ अंतिम होईल, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news