kolhapur municipal corporation | महापौरपदासह सत्तावाटपाचा फॉर्म्युला अद्याप अधांतरी

दोन दिवसांत महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांच्या प्रमुखांची निर्णायक बैठक
Kolhapur Municipal Corporation mayor
kolhapur municipal corporation | महापौरपदासह सत्तावाटपाचा फॉर्म्युला अद्याप अधांतरीFile Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेवर सत्ता स्थापन करण्याचा दावा महायुतीने केला असला, तरी महापौरपदासह सत्तेच्या वाटपाचा नेमका फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. निवडणूक निकाल लागून आठ दिवस उलटले तरी सत्तास्थापनेबाबत अपेक्षित हालचाली न झाल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसांत महायुतीतील तिन्ही घटक पक्षांच्या प्रमुखांची बैठक होण्याची शक्यता असून, याच बैठकीत सत्तावाटपाचा आराखडा ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच जि. प. निवडणुकांचा बिगुल वाजल्याने महापालिकेतील सत्तेच्या गणिताकडे अपेक्षेइतके लक्ष देता आले नाही. महापालिका निकालाचा गुलाल अंगावर असतानाच नेतेमंडळी जिल्हा परिषद निवडणुकांच्या ‘जोडण्यां’मध्ये गुंतल्यामुळे महापौरपद आणि सत्तावाटपाबाबत औपचारिक चर्चा आजतागायत झाली नसल्याचे वास्तव आहे.

50 वर्षांनंतर पहिल्यांदाच महायुतीची सत्ता

कोल्हापूर महापालिकेच्या राजकारणात हा एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे. तब्बल 50 वर्षांनंतर पहिल्यांदाच महायुतीची सत्ता महापालिकेत येणार आहे. यापूर्वी आघाडी आणि नंतर स्वतंत्र पक्षांच्या राजकारणाने महापालिका चालवली गेली. गेली 15 वर्षे दोन्ही काँग्रेसची सत्ता असलेली ही महापालिका आता महायुतीकडे गेल्याने सत्तांतराचा नवा अध्याय सुरू झाला आहे.

आघाडी नोंदणीवर सर्वांचे लक्ष

महापालिकेतील राजकीय आघाड्यांची नोंदणी यावेळी नेहमीपेक्षा अधिक क्लिष्ट करण्यात आल्याने सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांचे लक्ष या प्रक्रियेकडे केंद्रित झाले आहे. 27 किंवा 28 जानेवारीला महायुती तसेच महाविकास आघाडीची नोंदणी विभागीय आयुक्तांकडे केली जाणार आहे. यासाठी सर्वच आघाड्यांतील अनुभवी नगरसेवकांकडे जबाबदारी सोपविली असून, कागदपत्रांची जुळवाजुळव अंतिम टप्प्यात आहे.

आरक्षण जाहीर, पण नेत्यांचे धोरण थांबा, पाहा आणि जा

गुरुवारी (दि.22) महापौरपदाचे आरक्षण जाहीर झाले असून, कोल्हापूरचे महापौरपद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या पातळीवर हालचाली वाढल्या असल्या, तरी नेत्यांच्या स्तरावर अद्याप ठोस चर्चा झालेली नाही. दरम्यान, भाजपने शुक्रवारी गटनेता निवडीसाठी बैठक घेऊन नावे प्रदेश कार्यकारिणीकडे पाठविली आहेत. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही गटनेता निवडीची औपचारिकता पूर्ण केली आहे.

महापौर निवडीची तारीख गुलदस्त्यात

महापौर निवडीची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. या महिनाअखेरपर्यंत निवड होण्याचा अंदाज व्यक्त केला जात असला, तरी काही राजकीय वर्तुळात फेब—ुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत निवडणूक पुढे ढकलली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त सलग सुट्ट्या असल्याने मंगळवार (दि.27) नंतरच याबाबत स्पष्टता मिळण्याची शक्यता आहे. नगरविकास विभागाकडून मात्र अद्याप कोणतेही ठोस संकेत देण्यात आलेले नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news