

कोल्हापूरपासून फक्त 35 किलोमीटरवर असलेल्या प्रसिद्ध मसाई पठारवर पर्यटकांसाठी आता नवे नियम लागु करण्यात आले आहेत. राज्य वन्यजीव मंडळाने या परिसराला ‘संवर्धन राखीव क्षेत्र’ म्हणून घोषित केले आहे. यामुळे येथील जैविक विविधता आणि वन्यजीवांचे संरक्षण करणे शक्य होईल, आणि त्यासाठी प्रवेश शुल्क आकारण्यात येईल.
वन विभागाने सांगितले आहे की, विनापरवाना प्रवेश करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाईल. पर्यटकांनी नियम पाळणे गरजेचे आहे, अन्यथा दंड आणि कारवाईचा सामना करावा लागेल.
मसाई पठार सुमारे ५.३४ चौ.किमी परिसरात पसरलेले आहे. येथे दुर्मिळ वनस्पती, पक्षी आणि अन्य जीवसृष्टी आढळते. पर्यटकांच्या मोठ्या गर्दीमुळे नैसर्गिक पर्यावरणावर परिणाम होऊ शकतो, म्हणून नाममात्र शुल्क आकारणे गरजेचे ठरले, यामुळे निसर्गाच्या संवर्धनास हातभार लावणयास मदत होईल.
पन्हाळ्यापासून फक्त ८ किलोमीटर अंतरावर असलेले मसाई पठार हिरव्या गवताने आच्छादित शालसारखे दिसते.
हे पठार पाचगणीच्या टेबल लँडपेक्षा मोठे असून याची लांबी सुमारे ४ ते ५ किलोमीटर आहे.
हंगामानुसार हजारो पर्यटक येथे भेट देतात, त्यामुळे पर्यावरण आणि वन्यजीवांचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे.
सोबत कॅमेरा असल्यास शुल्क: ₹200
दुचाकी वाहन: ₹20
चारचाकी वाहन: ₹50
नियम पाळणे गरजेचे आहे, नसेल तर दंड होऊ शकतो.
निसर्ग आणि वन्यजीवांचा आदर करावा.
कचरा टाकू नका; पर्यावरण शुद्ध ठेवण्यास मदत करा.
कॅमेरा फोटोग्राफीसाठी वापरा, पण प्राण्यांना त्रास देऊ नका.
"मसाई पठार जैवविविधतेने समृद्ध आहे. येथील निसर्गसंपत्तीचे जतन करणे आवश्यक आहे. म्हणूनच प्रवेश शुल्क लागू केले आहे. या निर्णयामुळे पर्यटकांचा अनुभवही शिस्तबद्ध होईल."
उपवनरक्षक धैर्यशील पाटील ,