Maratha survey : शाहूवाडी’त १२ हजार ३३५ कुटुंबाचे मराठा सर्व्हेक्षण; प्रगणकांकडून युध्दपातळीवर काम सुरु

Maratha survey : शाहूवाडी’त १२ हजार ३३५ कुटुंबाचे मराठा सर्व्हेक्षण; प्रगणकांकडून युध्दपातळीवर काम सुरु


विशाळगड : मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी 'शाहूवाडी'त मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तालुक्यातील ४२ हजार ३२५ कुटुंबापैकी दोन दिवसांत १२ हजार ३३५ कुटुंबाचे मराठा समाज सर्व्हेक्षण प्रगणकामार्फत करण्यात आल्याची माहिती तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी दिली. दिवसाला दहा ते १५ कुटूंबाची माहिती ऑनलाईन भरली जात आहे. Maratha survey

आरक्षणामध्ये पुर्वीपासून असणाऱ्या प्रवर्गातील कुटूंबाचा फॉर्म भरण्यास काहीच मिनिटे लागतात. मात्र, मराठा व खुल्या प्रवर्गातील कुटूंबातील एक फॉर्म भरण्यास पाऊण तास वेळ लागत असल्याचे चित्र आहे. मराठा समाजाचे मागसलेपण तपासण्यासाठी तालुकास्तरावर १२ नोडल अधिकारी व १२ सहाय्यक नोडल अधिकारी नियुक्त केले आहेत. तसेच, २६८ प्रगणकांच्या व १८ पर्यवेक्षक यांच्या माध्यमातून गावागावात जाऊन ऑनलाईन माहिती घेतली जात आहे. नोंदणी करणाऱ्या प्रत्येक प्रगणकावर किमान १०० कुटूंबाच्या नोंदणीची जबाबदारी आहे. मात्र, सर्व्हर डाऊन, ओटीपी न मिळणे अशा अनेक अडचणींचा सामना करत प्रगणकांकडून माहिती संकलित केली जात आहे. Maratha survey

प्रत्येक कुटूंबाची माहिती ऍपमधील फॉर्ममध्ये भरुन घेण्यासाठी सुमारे पाऊण तासाचा वेळ लागत आहे. हे काम ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करायचे आहे. त्यामुळे प्रशासकिय यंत्रणा युध्दपातळीवर काम करत आहे. मात्र, सर्व्हर डाऊनचा मोठा अडथळा येत असल्याचे चित्र आहे. २६८ प्रगणकांद्वारे ४२ हजार ३२५ कुटुंबांचे सर्वेक्षण होणार आहे. गावागावात मराठासह खुल्या वर्गातील समाजांकडून सर्वेक्षणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण तालुक्यात सुरू आहे. राज्य मागासवर्ग आयोगाकडून दिलेल्या सूचनेनुसार हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. समाजातून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्वेक्षणाचा कालावधी कमी असल्याने प्रगणक सकाळी लवकर अथवा सायंकाळी उशिरा सर्वेक्षणासाठी येऊ शकतात. तरी नागरिकांनी त्यांना आवश्यक माहिती देऊन सर्वेक्षणास सहकार्य करावे.

– रामलिंग चव्हाण, तहसीलदार शाहूवाडी

तालुक्याची सर्व्हेक्षण स्थिती :

कुटुंबाची संख्या : ४२ हजार ३२५
आजअखेर सर्वेक्षण : १२ हजार ३३५

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news