Kolhapur Crime : विश्वास नांगरे - पाटील बोलतोय... म्हणत डिजिटल ॲरेस्टच्या भीतीने १५ लाखांचा गंडा

सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची फसवणूक; आधार कार्डचा गैरवापर झाल्याची भीती
Digital Arrest Scam
Digital Arrest Scam | file photo
Published on
Updated on

कोल्हापूर : नमस्कार... मी विश्वास नांगरे - पाटील बोलतोय... तुमच्या आधार कार्डचा गैरवापर करून स्कॅम केला आहे. तुम्हाला डिजिटल ॲरेस्ट केले असून, यातून बाहेर पडण्यासाठी १५ लाख रुपये पाठवा अशी भीती घालून कोल्हापुरातील निवृत्त लिपिकास १५ लाखांचा गंडा घातला. याबाबतची फिर्याद चंद्रकांत राणोजी माने (वय ७५, रा. नागाळा पार्क) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली.

चंद्रकांत माने वृत्त लिपीक आहेत. पत्नीसोबत ते नागाळा पार्क येथील फ्लॅटवर राहतात, तर त्यांची मुले परगावी आहेत. शनिवार, दि. १८ रोजी दुपारी त्यांना कुलाबा पोलिस ठाण्यातून रोहितकुमार नावाच्या व्यक्तीचा फोन आला. ‘तुमच्या आधार कार्डचा गैरवापर करून मुंबईतील बॅंकेत खाते उघडले आहे. या बँक खात्याचा वापर करून मोठा स्कॅम झाल्याची भीती घालून डिजिटल ॲरेस्ट केल्याचे सांगितले. तसेच व्हॉटस्‌ॲपवर अटक वॉरंट आणि इतर कागदपत्रे पाठविली.

माने यांच्या मोबाईलवर दुसऱ्या दिवशी पुन्हा फोन आला. यावेळी आमचे साहेब विश्वान नांगरे-पाटील बोलणार असल्याचे सांगितले. दुसऱ्या व्यक्तीने ‘तुमच्या आधार कार्डचा गैरवापर झाला असून यातून तुम्हाला बाहेर काढतो,’ असे सांगितले. सोमवार, दि. २० रोजी माने यांना पुन्हा संपर्क करून पोस्ट खात्यावरील १५ लाखांची ठेव मोडून ती रक्कम हिमाचल येथील एका बँक खात्यावर भरण्यास सांगितली. यानुसार माने यांनी मंगळवारी आरटीजीएसद्वारे ही रक्कम भरली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news