कौलव; पुढारी वृत्तसेवा : शाहूनगर परिते ता. करवीर येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब पाटील कौलवकर यांच्या पुण्यतिथी निमित्त कारखान्याच्या वतीने कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत पहिल्या क्रमांकाच्या लढतीत महाराष्ट्र केसरी बाला रफिक याने गणेश जगताप ( पुणे) याला अवघ्या २० मिनिटांत लपेट डावावर चितपट करत भोगावती साखर केसरीचा किताब पटकावला.
दुसऱ्या क्रमांकाचा भोगावती कामगार केसरीचा किताब श्रीमंत भोसले (इचलकरंजी) याने व तिसऱ्या क्रमांकाचा भोगावती वाहतुक केसरीचा किताब बाबा रानगे (मोतीबाग तालीम) याने पटकावला. या मैदानात १७० हून अधिक चटकदार कुस्त्या झाल्या. दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत दिग्वीजय जाधव सुपणे हा जखमी झाल्यामुळे श्रीमंत भोसले इचलकरंजी याला विजयी घोषित करण्यात आले.
तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत बाबा रानगे (मोतिबाग) याने मंगेश बेले (सांगली) याला पोकळ घिस्सा डावावर चितपट केले. चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीत प्रतिक म्हेतर भोगावती कारखाना याने घिस्सा डावावर ओंकार पाटील मोतिबाग याला चितपट केले.
यावेळी पार्थ कळंत्रे पप्पू घोडके साई जाधव, अर्जून पाटील( बाचणी) स्वप्नील देसाई( बुद्धीहाळ) साहील जाधव (राशिवडे) राजवर्धन पाटील( राशिवडे) ऋषिकेश पाटील (नंदवाळ) पार्थ पाटील( इस्पुर्ली) सुरज हवालदार ( बहिरेश्वर) राजवर्धन महाडेश्वर(निगवे खा) यांनी चमकदार कुस्तीत विजय मिळवले.
प्रारंभी दादासाहेब पाटील यांच्या प्रतिमेचे पुजन व आखाडा पुजन अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील व उपाध्यक्ष राजाराम कवडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हिंद केसरी दिनानाथसिंह , विनोद चौगले महाराष्ट्र केसरी विष्णू जोशिलकर ,तालीम संघाचे नुतन पदाधिकारी संभाजी वरुटे, बाजीराव कळंत्रे, पी . जी मेढे, सागर चौगले, आनंदा खराडे यांचा सत्कार करण्यात आला . दादासाहेब पाटील ट्रस्ट तर्फे ईश्वरा पाटील( गुडाळ) व सदाशिव रामाणे (माजगाव) यांना गुणवंत कामगार पुरस्कार देण्यात आला . यावेळी अध्यक्ष प्रा. पाटील उपाध्यक्ष कवडे याच्यासह सर्व संचालक मंडळ, कृष्णराव किरुळकर, क्रांतिसिंह पवार पाटील उपमहाराष्ट्र केसरी रंगराव कळंत्रे, पांडूरंग पाटील धैर्यशिल पाटील कौलवकर, प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील, ट्रस्टचे अध्यक्ष प्रा निवास पाटील, शिवाजी राव पाटील कौलवकर एच आर मॅनेजर विजय पाटील युनियन चे उपाध्यक्ष सुरेश पाटील कामगार प्रतिनिधी विजय पाटील, दत्तात्रय पाटील, शिवाजी नाईक तोडणी वहातुक संघटनेचे अध्यक्ष राजाराम पाटील, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पंच म्हणून संभाजी वरुटे, बाजीराव कळंत्रे विश्वास पाटील संभाजी पाटील, प्रकाश खोत, आनंदा खराडे, भरत कळंत्रे, तानाजी पाटील, रविंद्र पाटील, विलास पाटील, सिकंदर कांबळे, बाळासो मेटकर छोटा दादू चौगले, यांनी काम पाहिले . तर निवेदन कृष्णात चौगले व राजाराम चौगले यांनी केले.