

Live-in Partner Murder Kasba Bawda Stabbing
कोल्हापूर : लिव्ह- इन- रिलेशनशिपमध्ये राहूनही लग्नाला नकार देणाऱ्या कसबा बावडा येथील युवतीचा धारधार शस्त्राने भोसकून अमानुषपणे खून केल्याची थरारक घटना मंगळवारी (दि.३) दुपारी सरसोबतवाडी (ता. करवीर) येथे घडली. समीक्षा भारत नरसिंगे उर्फ बागडी (वय २३, रा. जयभवानी गल्ली) असे खून झालेल्या युवतीचे तिचे नाव आहे. खुनाच्या घटनेनंतर सतिश मारूती यादव ( वय २५, रा. शिवाजीपेठ, कोल्हापूर) हा पसार झाला आहे. संशयिताच्या शोधासाठी गांधीनगरसह स्थानिक गुन्हे अन्वेषणची संयुक्त पथके ठिकठिकाणी रवाना झाली आहेत. या घटनेमुळे सरनोबतवाडीसह मणेरमळा हादरला आहे. शहरात खळबळ माजली आहे.
युवतीचा खून झाल्याची बातमी शहरासह परिसरात वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळासह शासकीय रुग्णालयात नातेवाईकासह नागरिकांची गर्दी झाली होती. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देवून तपासाच्या सुचना दिल्या.
तरुणाने तरुणीच्या छातीत चाकू खुपसून खून केल्याने चाकू तरुणीच्या बरगडीतच अडकल्याची प्राथमिक माहिती आहे. दोघे तरुण तरुणी एकाच इव्हेंट कंपनीत काम करत होते. तसेच ते दोघे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. तरुणाने तरुणीकडे लग्नाची मागणी घातली होती, असे समजते. त्यातून त्याने हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे.