Kolhapur News : दिवस-रात्र बिबट्याची शोधमोहीम सुरूच

थर्मल ड्रोनच्या सहाय्याने परिसरात पाहणी; पायाचे ठसे दिसले, मात्र बिबट्या दिसलाच नाही
leopard sighting
leopard sightingpudhari photo
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : टेंबलाई मंदिर ते लक्षतीर्थ वसाहत परिसरात सोमवारी रात्री बिबट्या दिसल्यामुळे या परिसरात अखंड शोधमोहीम सुरूच आहे. सोमवारी रात्रभर आणि मंगळवारी दिवसभर ही मोहीम सुरू होती. दरम्यान, काही ठिकाणी बिबट्यांच्या पायाचे ठसे आढळले आहेत. थर्मल ड्रोनच्या सहाय्याने बिबट्याचा माग काढला जात आहे.

लक्षतीर्थ वसाहतीत बिबट्या दिसल्याची माहिती मिळताच या परिसरात सोमवारी रात्री वनविभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग, पोलिस दल आणि महापालिका अग्‍निशमन विभाग यांच्या वतीने संयुक्त शोध मोहीम सुरू करण्यात आली. रात्रभर ही शोध मोहीम सुरू होती. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. थर्मल ड्रोनच्या सहाय्याने परिसरातील ऊस शेती, नदीकाठ, निर्जन ठिकाणांसह लोकवस्तीतही बिबट्याचा शोध घेण्यात आला. बिबट्या दिसलाच तर त्याला बेशुद्ध करण्यासाठी ट्रॅक्युलायझर गनची (बेशुद्ध पाडण्यासाठीची बंदूक) व्यवस्था करण्यात आली आहे.

दरम्यान, लक्षतीर्थ वसाहत, फुलेवाडी, शिंगणापूर, नागदेववाडी, भुयेवाडी, वाठार या परिसरातील नदीकाठ आणि ऊस शेतीच्या भागात विविध टीमच्या माध्यमातून चौफेर शोध मोहीम सुरूच आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news