Kolhapur News : कुंभोजमध्ये दोन मंडळांवर कारवाई; ६६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

सहा जणांवर गुन्हे दाखल
Kolhapur News
कुंभोजमध्ये दोन मंडळांवर कारवाई; ६६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
Published on
Updated on

हातकणंगलेः कुंभोज ( ता . हातकणंगले ) येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत साऊंड सिस्टीममध्ये प्रेशर मिड्सचा वापर करून ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन मंडळांच्या अध्यक्षांसह सिस्टीमचे मालक ऑपरेटर आणि वाहन चालक अशा सहा जणावर गुन्हे दाखल करण्यात आले. एकूण ६६ लाख रुपयांची वाहनासह यंत्रसामुग्री हातकणंगले पोलिसांनी जप्त केली आहे . याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्टेबल शंतनू प्रकाश देसाई यांनी दिली आहे .

जय हिंद युवक संघ मंडळावर केलेल्या कारवाईत मंडळाचे अध्यक्ष प्रताप मल्हारी जगदाळे (वय २३, रा कुंभोज ), साऊंड सिस्टीमचे मालक व ऑपरेटर अभिषेक रविंद्र चव्हाण (वय ३० , रा . म्हसवे. जिल्हा. सातारा) , वाहन चालक मोहसिन आयूब मणेर (वय ४०, रा . भूईज, जिल्हा सातारा) अशी गुन्हे दाखल झालेल्या तिघांची नावे असून त्यांच्याकडून साडेचार लाख रुपये किंमतीचा बंदिस्त हौदा असलेला ट्रक ( नं . एम एच ३४ बीझेड ०५२९), १७ लाख रुपये किंमती साऊंड सिस्टीम असा एकूण २१ लाख ५० हजार रुपये किंमतीचा मुदेमाल जप्त केला.

तर बालाजी तरुण मंडळावर केलेल्या कारवाईत मंडळाचे अध्यक्ष प्रमोद भिमराव हराळे (वय २९ रा . कुंभोज , साऊंड सिस्टीमचे मालक व ऑपरेटर अक्षय बाजीराव तोत्रे ( २९, रा . सांडोली जि. पुणे) , ट्रक चालक निखिल राजू गायकवाड ( ३०, रा . मलठन जि पुणे) अशी गुन्हे दाखल झालेल्या तिघांची नावे असून त्यांच्या कडून साडे चार लाख रुपये किंमतीचा बंदिस्त हौदा असलेला ट्रक (नं . एमएच o४ एफ यु ३०५६ ) व ४०लाख रुपये किंमतीची साऊंड सिस्टीम असा ४४ लाख ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news