Kolhapur Crime : सात कोटीच्या फसवणुकीतून कोरोचीतील अभियंत्याने संपविले जीवन

भावाला लोकेशन शेअर करत जीवनयात्रा संपवली
Kolhapur Crime News
सुरज निर्मळे
Published on
Updated on

यड्राव : सात कोटी रुपयांच्या फसवणुकीतून कोरोची येथील अभियंत्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना उघडकीस आली आहे. सुरज अरुण निर्मळे (३४, रा. इंदिरानगर, कोरोची) असे त्याचे नाव आहे. जीवन संपविण्याआधी लोकेशन शेअर करीत टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण लिहिलेल्या चिठ्ठीबाबत भाऊ दीपक यास त्याने सांगितले.

सुरज मेकॅनिकल इंजिनिअर होता. तो वेल्डिंग रॉड पुरविण्यासह स्क्रॅप व्यवसाय करत होता. त्याने मित्र व नातेवाईकांकडून व्यवसायासाठी पैसे घेऊन शहापूर येथील भागीदारास दिले होते. भागीदाराकडे पैशाची मागणी केल्यानंतर त्याने सुरज व त्याच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देऊन तसेच खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती घातली होती. या नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याची माहिती सुरजच्या नातेवाईकांनी दिली. सुरजच्या मागे आजी, आई, पत्नी, मुलगी असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news