Temblai Temple : कोहळा पंचमीला टेंबलाई मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त

चेंगराचेंगरी, गोंधळ टाळण्यासाठी बॅरिकेटस्‌ उभारण्याचा निर्णय
Temblai Temple
कोहळा पंचमीला टेंबलाई मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पाचव्या माळेस ललिता पंचमीस (दि. १५) अंबाबाई देवीची पालखी त्र्यंबोली देवीच्या भेटीस जाते. यावेळी होणाऱ्या कोहळा फोडण्याच्या विधीवेळी होणारी धक्काबुक्की आणि चेंगराचेंगरी टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाने सोहळा स्थळावर बॅरिगेटिंग करून भाविकांना थांबविण्यात येणार आहे. सोहळ्याच्या ठिकाणी केवळ पुजारी आणि पालखी मानकऱ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे.

ललित पंचमीला टेंबलाईवाडी येथील टेंबलाई मंदिरात कोहळा फोडण्याचा विधी उद्या (गुरुवारी) होत आहे. यावेळी फोडलेला कोहळ्याचा तुकडा मिळवण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यावेळी झटापट होऊन चेंगराचेंगरी होते. यामुळे पोलिस प्रशासनाला सौम्य लाठीचार्जदेखील करावा लागतो. हा गोंधळ टाळण्यासाठी यंदा राजारामपुरी पोलिसांनी सोहळ्याच्या ठिकाणी बॅरिगेटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक विकास जाधव यांनी मंगळवारी सायंकाळी पाहणी करून सूचना दिल्या. कोहळा फोडण्याचा विधी ज्या ठिकाणी होतो. त्या ठिकाणापासून काही अंतरावर पोलिस बंदोबस्त लावण्यात येणार आहे. तसेच, बॅरिगेटिंग करून भाविकांना याच ठिकाणी थांबविण्यात येणार आहे.

कोहळा फोडण्याच्या विधी वेळी काही हुल्लडबाजांमुळे चेंगराचेंगरी आणि धक्काबुक्की केली जाते. हा गोंधळ थांबवून भाविकांना सोहळा पाहता यावा, यासाठी बॅरिगेटिंगचा निर्णय घेतला आहे.
विकास जाधव, पोलिस निरीक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news