Kolhapur Crime : कोडोलीत पत्नीच्या निधनाच्या विरहातून पतीने संपविले जीवन

८ महिन्यांपूर्वी आजाराने झाले होते पत्नीचे निधन
Kolhapur Crime News
कोडोलीत पत्नीच्या निधनाच्या विरहातून पतीने संपविले जीवन
Published on
Updated on

कोडोली : आठ महिन्यांपूर्वी पत्नी छाया यांचे आजाराने निधन झाल्याने विरहातून सर्वोदय सोसायटी कर्ज विभागाचे मॅनेजर पती कृष्णात शंकर कापरे (वय ५३, रा. कापरे फड वस्ती, कोडोली, ता. पन्हाळा) यांनी घराजवळील जनावरांच्या गोठ्यामध्ये दोरीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. ही घटना शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली.

येथील कापरे फड येथे कृष्णात कापरे राहत होते. आठ महिन्यांपूर्वी त्यांची पत्नी छाया यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. याचा जबरदस्त धक्का कृष्णात यांना बसला होता. तेव्हापासून ते नैराश्यात होते. ते एकटे एकटेच असायचे.

शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान कृष्णात हे सर्वोदय सोसायटी येथून कामावरून घरी आले. जेवण केले व घरातील कोणास न सांगता ते घराच्या मागे असलेल्या जनावरांच्या गोठ्यात गेले. तेथे तुळईस दोरीने गळफास लावून घेऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. बराच वेळ झाला, तरी कृष्णात घरी न आल्याने सायंकाळी सहा वाजता नातेवाईकांना त्यांचा शोध घेतला असता जनावरांच्या गोठ्यामध्ये त्यांनी गळफास लावून जीवन संपविल्याचे निदर्शनास आले. कृष्णात यांच्या मागे आई-वडील, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. या घटनेची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news