kolhapur | कोल्हापूरने घडवला वैद्यकीय इतिहास!

गुडघेदुखी उपचारांमध्ये कोल्हापूरचे नाव जगाच्या नकाशावर
Kolhapur knee treatment
kolhapur | कोल्हापूरने घडवला वैद्यकीय इतिहास!
Published on
Updated on

कोल्हापूर ः रिजनरेटिव्ह ऑर्थोपेडिक उपचार क्षेत्रात कोल्हापूरने नुकतीच एक महत्त्वपूर्ण कामगिरी केली. ग्रेड 2 आणि ग्रेड 3 गुडघा ऑस्टिओआर्थोयटिससाठी (गुडघ्यांची झीज) एका नव्या अध्यायाची सुरुवात शहरात झाली. नागाळा पार्क येथील वर्धमान ऑर्थो केअर अँड वेलनेस सेंटरमध्ये डॉ. महावीर पाटील आणि त्यांच्या टीमने आंतरराष्ट्रीय दर्जाचे पहिले ‘इंट्रा आर्टिक्युलर मेसेनकायमल स्टेम सेल्स प्रत्यारोपण’ यशस्वी केले.

ही प्रक्रिया ऑपरेशन न करता, कोणतीही चिरफाड न करता व अ‍ॅडमिट न करता वेदनारहित पेनलेस इंजेक्शनद्वारे करण्यात आली. या यशामुळे कोल्हापूरचे नाव अ‍ॅडव्हान्स्ड रिजनरेटिव्ह उपचार देणार्‍या निवडक जागतिक केंद्रांच्या यादीत समाविष्ट झाले आहे. आतापर्यंत अशा प्रकारचे उपचार प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय संस्था किंवा भारतातील काही निवडक मेट्रो शहरांपुरते मर्यादित होते.

गुडघा ऑस्टिओआर्थोयटिस हा झिजजन्य सांध्यांचा आजार असून, वृद्ध लोकसंख्येत मोठ्या प्रमाणावर आढळतो. पारंपरिक उपचारांमध्ये वेदनाशामक औषधे, फिजिओथेरपी, इंजेक्शन्स किंवा शेवटी कृत्रिम गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यांचा समावेश होतो. मात्र, अलॉजेनिक स्टेम सेल प्रत्यारोपणामुळे मध्यम अवस्थेतील (ग्रेड 2 व 3) ऑस्टिओआथर्—ायटिस रुग्णांना शस्त्रक्रियेविना पर्याय उपलब्ध झाला आहे. या उपचारांचा उद्देश सूज कमी करणे, वेदना कमी करणे, हालचाल सुधारणे आणि शस्त्रक्रियेची गरज पुढे ढकलणे किंवा काही प्रकरणांमध्ये टाळणे हा आहे.

उपचारांसाठी वापरण्यात आलेले स्टेम सेल्स तीन निरोगी दात्यांकडून संकलित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलनुसार त्यांची काटेकोर वैद्यकीय तपासणी आणि गुणवत्ता परीक्षण करण्यात आले. संकलनानंतर या पेशी अधिकृत स्टेम सेल बँकेत प्रक्रिया करून ड्ढ185°C पेक्षा कमी तापमानात सुरक्षित ठेवण्यात आल्या, ज्यामुळे त्यांची सुरक्षितता, कार्यक्षमता आणि जैविक सामर्थ्य अबाधित राहिले.

प्रारंभिक क्लिनिकल प्रतिसाद उत्साहवर्धक असून, काही आठवड्यांत वेदना कमी होणे आणि सांध्याच्या हालचालीत सुधारणा दिसून आली आहे. आरोग्य क्षेत्रातील जाणकारांच्या मते, या प्रगतीमुळे रुग्णांना महानगरांमध्ये किंवा परदेशात उपचारांसाठी जाण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते.

सुलभता वाढविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम शालिनी फाऊंडेशन आणि International Cartilage Regeneration and Joint Preservation Society ( ICRS), स्वित्झर्लंड यांच्या सहकार्याने राबविण्यात येत असून, पात्र रुग्णांना सवलतीच्या दरात स्टेम सेल उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या महत्त्वपूर्ण टप्प्यामुळे कोल्हापूरने प्रगत स्टेम सेल उपचार क्षेत्रात जागतिक मानदंड प्रस्थापित करत जागतिक दर्जाचे अ‍ॅडव्हान्स्ड रिजनरेटिव्ह उपचार स्थानिक पातळीवर उपलब्ध करून दिली आहे.

डॉ. पाटील हे Advanced Bioregenerative Orthopedic Consultant, इंटरनॅशनल बोर्ड-प्रमाणित स्टेम सेल तज्ज्ञ व अमेरिकन बोर्ड ऑफ रिजेनेरेटिव्ह मेडिसीनचे डिप्लोमॅट आहेत . तसेच, जागतिक मंचावर 67 देशांतील 1,300 हून अधिक तज्ज्ञ आणि संशोधक सहभागी असणार्‍या ICRS (International Cartilage Regeneration and Joint Preservation Society), स्वित्झर्लंडचे सक्रिय सदस्य आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news