Navodaya Exam Kolhapur | कोल्हापूर जिल्ह्यात नवोदय परीक्षा सुरळीत: 11, 548 पैकी 80 विद्यार्थी निवडले जाणार

37 परीक्षा केंद्रावर परीक्षा, 469 विद्यार्थी गैरहजर
Kolhapur District Navodaya School Exam
मुरगुड जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी मुरगुड विद्यालय केंद्रावर पालक व विद्यार्थ्यांनी केलेली गर्दीPudhari
Published on
Updated on

Kolhapur District Navodaya School Exam

मुदाळतिट्टा: जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा कोल्हापूर जिल्ह्यात सुरळीत संपन्न झाली. एकूण 37 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली. 12017 नोंदणी विद्यार्थ्यांपैकी 115 48 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेत बसले 469 विद्यार्थी गैरहजर राहिले. जवाहर नवोदय विद्यालय कागल चे प्राचार्य रवी दामोदर, विभाग प्रमुख एचडी पन्हाळकर, संग्राम पाटील, रत्नाकर कुलकर्णी यांनी या परीक्षेचे काम पाहिले.

स्टेट बँकेच्या कागल शाखेमधून प्रश्नपत्रिका वितरण केंद्रप्रमुख व केंद्र निरीक्षक यांच्याकडे करण्यात आले. अतिशय गोपनीय पद्धतीने परीक्षेचे कामकाज हाताळण्यात आले. कोल्हापूर जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ या ठिकाणी परीक्षेचे संपूर्ण साहित्य जमा करण्यात आले. मागील वर्षापेक्षा यावर्षी 2500 विद्यार्थी या परीक्षेसाठी जादा बसले. 11548 विद्यार्थ्यापैकी फक्त 80 विद्यार्थी निवडले जाणार आहेत.

Kolhapur District Navodaya School Exam
Kolhapur temperature drop | कोल्हापूर गारठले...! पारा १३.५

मागील वर्षभर विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अभ्यास केला होता. शनिवारी (दि.13) हे विद्यार्थी तणाव मुक्त झाले. परीक्षा संपताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. निर्धारित वेळेत आपल्या पाल्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचवण्यासाठी पालकांची धावपळ उडाली. परीक्षा केंद्रावर पोहोचल्यानंतर परीक्षा नंबर आपल्या पाल्यांना शोधून देणे चे काम पालक करत होते. नवोदयची परीक्षा संपन्न झाली आता निकालाकडे लक्ष लागून राहिले आहे. यावर्षी परीक्षा सुरळीत आणि चांगली झाल्याबद्दल प्राचार्य रवी दामोदर व त्यांच्या सहकार्यांनी समाधान व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news