Kolhapur News : गुंतवणुकीवर परतावा आमिषाने फसवणूक; दोघा जणांना अटक

एक वर्षापासून होते पसार; कसबा बावडा येथील डॉक्टरांची ९८ लाखांची फसवणूक प्रकरण
Kolhapur News
गुंतवणुकीवर परतावा आमिषाने फसवणूक; दोघा जणांना अटक
Published on
Updated on

कोल्हापूर : रिअल इस्टेल कंपनीत गुंतवणुकीवर महिना १० टक्के परताव्याच्या आमिषाने ९८ लाखांची फसणूक करून पसार झालेल्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणने अटक केली. वैभव वामन जोशी ऊर्फ वैभव वामन पाटील (वय ३२, रा. शांतिनगर, पाचगाव) व रुपेश दत्ता गायकवाड (वय ३५, रा. माळवाडी, पाचगाव) अशी त्यांची नावे आहेत. २०२५ मध्ये डॉ. मनोज गायकवाड यांनी याबाबतची फिर्याद शाहूपुरी पोलिसात दिली होती.

संशयित वैभवने २०२१ मध्ये लाईफमार्क रिअल इस्टेट कंपनीची सुरुवात करून गुंतवणूकीवर महिना १० टक्के परताव्याची जाहिरात केली होती. कसबा बावडा येथील डॉ. गायकवाड यांनी ९८ लाख ९६ हजार रु. गुंतविले. २०२३ पर्यंत वैभवने परतावा दिला; मात्र त्यानंतर परतावा बंद करून वैभव जोशी गायब झाला. फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच डॉ. गायकवाड यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार वैभव जोशी, पत्नी, आई संचालक, एजंटांविरोधात गुन्हा दाखल होता. यापूर्वी पत्नी, आईला अटक झाली होती. वैभव मंगळवारी रात्री उद्यमनगर येथे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हेचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना मिळाली. सापळा रचून संशयित वैभव जोशी व एजंट रूपेश गायकवाड यांना अटक केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news