कोल्‍हापूर : आंतरराष्ट्रीय नेमबाज सोनम मस्करची वर्ल्डकप स्पर्धेसाठी निवड

आंतरराष्ट्रीय नेमबाज सोनम मस्कर
आंतरराष्ट्रीय नेमबाज सोनम मस्कर

गारगोटी /मिणचे खुर्द : पुढारी वृतसेवा कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय नेमबाज व पुष्पनगर (ता. भुदरगड) सुवर्णकन्या सोनम मस्कर हिची जानेवारी 26 ते 30 दरम्यान कैरो इजिप्त येथे होणाऱ्या इन्टरनॅशनल शुटींग स्पोटर्स फेडरेशन (ISSF ) वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिने चालू वर्षी नॅशनल रायफल असोसिएशनकडून घेण्यात आलेल्या भारतीय निवड चाचणी एक व दोन मध्ये 632.1 व 634.5 अशी सातत्यपूर्ण कामगिरी केली होती. त्‍यातून तिची पुन्हा एकदा भारतीय संघात निवड झाली आहे.

गेल्या वर्षभरात तिची ही सलग चौथी तर सिनियर कॅटेगरीमध्ये पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. ती भारतीय संघाचे प्रतिनिधित्व वैयक्तिक व सांघिक अशा दोन प्रकारात करणार आहे. नुकत्याच झालेल्या ज्युनियर वर्ल्ड कप व ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये व एशियन चॅम्पियनशिप मध्ये तिने सांघिक एक रौप्य व सांघिक दोन सुवर्णपदक मिळवले आहे.

सोनम मुळची पुष्पनगर गारगोटीची रहिवासी असून, या कामगिरीबद्दल कोल्हापूर जिल्ह्यातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ती गेली चार वर्ष वेध रायफल अँड पिस्‍टल शूटिंग अकॅडमी मध्ये आंतरराष्ट्रीय नेमबाज व शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या राधिका बराले – हवालदार व रोहित हवालदार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news