कोल्हापूर : गजापुरात पतीनेच केला पत्नीचा खून

file photo
file photo

विशाळगड : पुढारी वृत्तसेवा : वृद्ध पतीने आपल्या पत्नीचा खून केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. लक्ष्मी दगडू चौगुले (वय ६२, रा गजापूर पैकी दिवाणबाग, ता शाहूवाडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पती दगडू सखाराम चौगुले (वय ७०) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत मुलगा गणेश दगडू चौगुले (वय ३९ ) याने पोलिसांत फिर्याद तक्रार दिली आहे.
ही घटना शुक्रवारी रात्री घडली. या घटनेची नोंद शाहूवाडी पोलिसांत झाली आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, गजापूर पैकी दिवाणबाग येथे दगडू सखाराम चौगुले व पत्नी लक्ष्मी दगडू चौगुले हे दोघेच राहतात. त्यांची दोन्ही मुले कामानिमित्त मुंबईला आपल्या कुटुंबासह राहतात. आरोपी दगडू चौगुले यांना मद्य प्राशन करण्याची सवय होती. तसेच ते डोक्याने सर्किट म्हणजे वेडसर होते. ते पत्नीसोबत वारंवार भांडण काढत व काही वेळा मारझोडही करत होता. मुलगा गणेश हा दररोज आईला मुंबईवरून खुशाली विचारण्यासाठी फोन लावत असे. शुक्रवारीही त्याने वडिलांना फोन लावला. मात्र ती बाहेर गेली आहे असे सांगितले. त्यानंतर शनिवारीही चार पाच वेळा फोन लावला असता वडिलांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्याला शंका आली. त्यानंतर त्याने शेजाऱ्यांना फोन लावून विचारपूस केली असता तू गावी ये असे सांगण्यात आले.

पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन अधिक चौकशी केली असता आरोपी हे उडवाउडवीची उत्तरे देऊ लागलेत. अखेर पोलिसी खाक्या दाखववताच आरोपीने मयत लक्ष्मी यांचा खून केल्याचे कबूल केले. मृतदेह खड्यातून बाहेर काढला असता मयत लक्ष्मी यांना हातापायाला दोरीने बांधून चटईमध्ये गुंढाळल्याचे व त्यांच्या अंगावर व्रण असल्याचे निदर्शनास आले. पोलीसांनी उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. रात्री उशिरा मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत लक्ष्मी यांच्या मागे आरोपी पती, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांच्यासह पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस नाईक भुरुगडे करत आहे.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news