कोल्‍हापूर : हलकर्णी फाटा येथे घराला आग लागून लाखोंचे नुकसान; २ जण जखमी

file photo
file photo
Published on
Updated on

चंदगड : पुढारी वृत्तसेवा हलकर्णी फाटा येथील सूर्यकांत महागावकर यांच्या घराला शॉर्ट सर्किटने आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. यामध्ये प्रापंचिक साहित्यासह मौल्यवान वस्तू आगीच्या भक्षस्थानी पडल्या.

गुरुवारी रात्री ३ वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. प्रथमतः कपड्यांनी पेट घेतला. आग लागताच सूर्यकांत यांना जाग आली. घरातील सर्वांना बाहेर काढून आरडाओरडा केला. फाट्यावरील लोक जमा झाल्यानंतर दौलत – अथर्व साखर कारखान्याचे पाण्याचे टँकर मागवले. दरम्यान चंदगड येथूनही अग्निशमन पथक दाखल झाले. चंदगड अर्बन बँकेचे अध्यक्ष दयानंद काणेकर, सुनील काणेकर यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. वेळीच दौलत- अथर्व प्रशासनाने पाठवलेल्या पाण्याचा टँकर व चंदगड नगरपंचायतच्या अग्निशामक दलाच्या तत्परतेने आग आटोक्यात आली. आग शॉर्ट सर्किट किंवा गॅस लिकेज झाल्याने लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, आगीचे नेमके कारण कळू शकले नाही.

हलकर्णी फाटा ते दौलत-अथर्व साखर कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ सूर्यकांत महागावकर यांचे दोन मजली घर आहे. या ठिकाणी त्यांच्या पत्नी, मुलगा, सून व दोन नातवंडे असा परिवार राहतो. आज पहाटेच्या दरम्यान अचानक स्फोट होऊन मोठा आवाज झाल्याने घरातील सर्वानाच जाग आली. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले.

व्यापारी वर्गाने दौलत-अथर्वचे सचिव विजय मराठे यांना संपर्क केला. त्यांनी तात्काळ पाण्याचा टँकर पाठवून दिला. तसेच चंदगड दयानंद काणेकर, सामाजिक कार्यकर्ते सुनील काणेकर, चंदगड नगरपंचायत यांना संपर्क केला असता अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. याचबरोबर काणेकर यांनी घटनास्थळी धाव घेवून आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. या दुर्घटनेत महागावकर कुटुंबीयही जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी बेळगाव येथे खासगी दवाखान्यात दाखल केले आहे. दरम्यान, नेमकी आग कशामुळे लागली याचे नेमके कारण कळू शकले नाही.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news