Kolhapur : पैसे पडल्याची बतावणी करून हॉटेल व्यावसायिकाला 6.70 लाखांना गंडा

वडगावमधील घटना; रक्कम घेऊन बँकेतून बाहेर पडताच चोरट्यांनी साधला डाव
Fraud Case |
पैसे पडल्याची बतावणी करून हॉटेल व्यावसायिकाला 6.70 लाखांना गंडाPudhari File Photo
Published on
Updated on

पेठवडगाव : गाडीमागे पैसे पडल्याची बतावणी करत मोटारसायकलला अडकवलेली तब्बल सहा लाख सत्तर हजार रुपयांची रोकड असलेली पिशवी चोरट्यांनी भरदिवसा लांबवल्याची घटना मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास बँक ऑफ इंडियाच्या वडगाव शाखेसमोर घडली. वडगाव पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हातकणंगले तालुक्यातील सावर्डे येथील हॉटेल व्यावसायिक रामचंद्र तुकाराम लुगडे हॉटेल बांधकामासाठी पतसंस्थेतून घेतलेल्या कर्जाची रक्कम काढण्यासाठी बँकेत आले होते. त्यांनी आठ लाख रुपये काढून त्यातील 1 लाख 30 हजार रुपये मुलाच्या खात्यावर भरले. उर्वरित 6 लाख 70 हजार रुपये पिशवीत घेऊन ते बँकेबाहेर आपल्या मोटारसायकलजवळ आले. पिशवी हँडलला अडकवून निघणार इतक्यात एका टोपी घातलेल्या तरुणाने ‘तुमचे पैसे खाली पडलेत’ असे सांगितले. लुगडे गाडीवरून उतरून नोटा गोळा करू लागले. हीच संधी साधत त्या तरुणाने हँडलला अडकवलेली पैशांची पिशवी हिसकावत मोटारसायकलवर थांबलेल्या साथीदारासह धूम ठोकली. लुगडे यांनी आरडाओरडा केला; पण चोरटे पसार झाले होते. घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जयसिंगपूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रोहिणी साळुंके व पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनीही पाहणी केली. पोलिसांची पथके रवाना झाली असून, अधिक तपास सहायक फौजदार चव्हाण करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news