Kolhapur News : 20 टक्के हॉटेल बंदच

गॅस कंपन्यांचा सिलिंडर वाटपाचा दावा फोल
Kolhapur News
शनिवार पेठ पोस्ट ऑफिस परिसरातील हॉटेलमध्ये पेटवलेली चूल.
Published on
Updated on

विनोद सावंत

कोल्हापूर : गॅस कंपनी व्यावसायिकांना 20 टक्के सिलिंडर वाटप सुरु केल्याचा दावा करत आहे. परंतू वास्तवात अद्यपी बहुतांशी हॉटेलांना सिलेंडर मिळालेले नसल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे शहरातील अनेक हॉटेल अद्यापी बंद आहेत.

जी हॉटेल सुरु आहेत. तेथे चुल, इंडक्शन, कोळसा आणि डिझेल शेगडीचा आधार घेतला जात असून ठराविक पदार्थच दिले जात आहेत. 20 टक्के हॉटेल अद्यपी बंदच आहेत. चूल पेटवलेल्या हॉटेलमध्ये इडली, चायनिज, पंजाबी बंद केले आहे. काही चहा विक्रेत्यांनीही व्यवसाय बंद केले. काही फेरीवाल्यांकडून मात्र, घरगुती गॅसचा वापर सुरु आहे.

हॉटेल व्यावसायिकांचे नुकसान होऊ नये यासाठी गॅस कंपन्यांनी बंद हॉटेलना प्राधान्याने सिलिंडर द्यावे. ब्लॅकने सिलिंडर देणाऱ्यांवर कडक कारवाई करावी.
- संजय शेटे, अध्यक्ष, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज
नियमानुसार व्यावसायिकांना गॅस पुरवठा होतो की नाही याची तपासणी पुरवठा विभागाने करावी. ब्लॅकने पुरवठा होणार नाही याची दक्षता घ्यावी.
- सचिन शानबाग, अध्यक्ष, हॉटेल मालक संघ
अनेक हॉटेल बंद असल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने जाहीर केल्यानुसार सिलिंडरचे वाटप त्वरित सुरू करावे.
अरुण चोपदार, उपाध्यक्ष, हॉटेल मालक संघ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news